तुम्ही कॉफीचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, ही बाब समोर आली आहे की, दररोज एक कप कॉफी प्यायल्याने शरीरातील फॅटसोबत लढणारी सुरक्षा उत्तेजित होते, ज्याने लठ्ठपणासोबतच डायबिटीसशी लढण्यास मदत मिळते. साइन्टिफिक रिपोर्ट्स नावाच्या जर्नलमध्ये हा रिसर्च प्रकाशित झाला आहे.
नेमका कसा होतो फायदा?
आपल्या शरीराचा एक भाग म्हणजे ब्राउन फॅट फंक्शन जो वेगाने कॅलरी बर्न करून एनर्जीमध्ये बदलण्यास आपली मदत करतो. आणि कॉफीमध्ये असे काही तत्त्व आढळतात, ज्यांचा या ब्राउन फॅट फंक्शनवर थेट प्रभाव पडतो. व्यक्तीच्या शरीरात २ प्रकारचे फॅट असतात. ज्यातील एका ब्राउन एडिपोज टिशू(BAT), ज्याला ब्राउन फॅटही म्हटलं जातं. याचं मुख्य काम शरीरात गरमी निर्माण करणं हे असतं, जेणेकरून शरीरातील कॅलरी बर्न केल्या जाव्यात. ज्या लोकांच्या शरीराचा बीएमआय म्हणजेच बॉडी मास इंडेक्स कमी असतो, त्यांच्या ब्राउन फॅटचं प्रमाण अधिक असतं.
(Image Credit : ScienceDaily)
ब्लड शुगर लेव्हलची लेव्हल चांगली करतं ब्राउन फॅट
युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगमचे प्राध्यापक आणि या रिसर्चचे मुख्य मायकल सायमंड्स म्हणाले की, 'ब्राउन फॅट शरीरात वेगळ्याप्रकारे काम करतं आणि गरमी निर्माण करून शुगर व फॅट बर्न करण्यास मदत करतं. जेव्हा या ब्राउन फॅटची अॅक्टिव्हिटी वाढवली जाते, तेव्हा याने शरीरातील ब्लड शुगर लेव्हलही नियंत्रणात राहते. सोबतच एक्स्ट्रा कॅलरी बर्न होतात, ज्याने वजन कमी करण्यास मदत मिळते.
अशात एक कप कॉफीचा ब्राउन फॅट फंक्शन्सवर थेट प्रभाव पडतो. तसा लठ्ठपणा या दिवसात जगभरात एखाद्या माहामारीसारखा पसरत आहे आणि डायबिटीसची समस्याही वाढत आहे. त्यामुळे ब्राउन फॅटच्या माध्यमातून या दोन्ही समस्या दूर केल्या जाण्याची शक्यता आहे.
ब्राउन फॅटला उत्तेजित करण्यास मिळते मदत
(Image Credit : Oregon Sports News)
सायमंड्स सांगतात की, कॉफीमध्ये असलेलं कॅफीन एक असं तत्व आहे, जे ब्राउन फॅटला उत्तेजित आणि अॅक्टिवेट करण्यास मदत करतं. अशात या कॉम्पोनेंटचा वापर वेट लॉस मॅनेजमेंटसोबतच ग्लूकोज रेग्यूलेशन प्रोग्रामसाठीही केला जाऊ शकतो. जेणेकरून लठ्ठपणा कमी करण्यासोबतच डायबिटीसही कंट्रोल केला जावा.