बदलत्या लाइफस्टाइलमुळे वेगवेगळ्या आजारांचा विळखा दिवसेंदिवस लोकांमध्ये वाढताना दिसत आहे. जसा हृदयरोगांचा धोका लहानांपासून मोठ्यांमध्ये वाढताना दिसतो, तसाच कर्करोग हा गंभीर आजारही दिवसेंदिवस डोकं वर काढताना दिसत आहे. गेल्या ६ वर्षात जगभरातील देशांमध्ये कर्करोगाच्या रुग्णांमध्ये १५.७ टक्क्यांनी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर पिव्हेंशन अॅन्ड रिसर्चने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या माहितीनुसार, वर्ष २०१२ मध्ये कर्करोगाशी संबंधित प्रकरणे १० लाखांच्या जवळपास होते, तेच २०१८ मध्ये कर्करोगांच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ ती आता ११.५ इतकी झाली आहे.
मुंबईच्या परळ येथील टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनुसार, वाढलेली लोकसंख्या आणि उपचाराच्या नव्या तंत्रज्ञानात झालेल्या विकासानंतर कर्करोगांच्या रुग्णात झालेली ही वाढ फार जास्त नाहीये. मात्र नव्या माहितीनुसार, कर्करोगाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत १२ टक्के वाढ झाली आहे. २०१२ मध्ये जिथे कर्करोगाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या ७ लाख होती, ती आता २०१८ मध्ये वाढून ७ लाख ८० हजार इतकी झाली आहे.
२०१२ ते २०१८ दरम्यान या ६ वर्षांच्या कालावधीत कर्करोगाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ८० हजाराने वाढ झाली असेलही. पण ICMR च्या कर्करोग सेंटरचे निर्देशक डॉ. रवि मेहरोत्रा यांच्यानुसार, लिप आणि ओरल कॅव्हिटी कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये गेल्या ६ वर्षात ११४ टक्के वाढ झालेली बघायला मिळत आहे. २०१२ मध्ये जिथे लिप आणि ओरल कॅव्हिटी कर्करोगाची प्रकरणे ५६ हजार होते, ते आता २०१८ मध्ये वाढून १ लाख झाले आहेत. त्यासोबतच शहरी लाइफस्टाइलशी निगडीत स्तनांच्या कर्करोगांच्या प्रकरणांमध्येही ११ टक्के वाढ झालेली बघायला मिळत आहे. २०१२ मध्ये स्तनांच्या कर्करोगाची प्रकरणे १.४ लाख होते, तेच आता २०१८ मध्ये वाढून १.६ लाख झाले आहेत.
तंबाखूमुळे ६० लाख लोकांचा मृत्यू
कॅन्सररोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, तंबाखूमुळे वर्षभरात सुमारे ६० लाख लोकांचा मृत्यू होतो. २०३० पर्यंत मृत्यूचा आकडा दरवर्षी आठ दशलक्षपर्यंत जाण्याची भीती आहे. भारतात सात टक्के मृत्यू तंबाखूमुळे होतात. जे ३० वर्षीय आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील असतात. तंबाखूमध्ये जवळपास २८ हानीकारक रसायने असतात. ज्यामुळे डोके आणि मानेचा कॅन्सर होऊ शकतो. सिगारेट न ओढणाऱ्यांच्या तुलनेत ओढणाऱ्यांमध्ये हा कॅन्सर होण्याची शक्यता १० टक्के जास्त असते.
‘हेड अॅण्ड नेक’ कॅन्सरमुळे श्वास घेणे, खाणे, बोलणे आणि तुम्ही कसे दिसता? हे सुद्धा नेहमीकरता बदलवू शकतो. भारतात ‘हेड अॅण्ड नेक’ हा तिसरा सामान्य कॅन्सर आहे. सहावा सामान्य कॅन्सर पुरुषांमध्ये, तर सातवा महिलांमध्ये आढळतो. कॅन्सरचे मुख्य कारण तंबाखू, लायीम, बिटेल आणि धुम्रपानाचे मौखिक सेवन हे आहे. भारतात चुना,पान व सिगारेट खूप प्रचलित असून, यामुळेच डोकं व मानेचा कॅन्सर होतो. तंबाखू खाण्याने कॅन्सर होतो. याशिवाय हृदय, फुफ्फुसे, टीबी, रक्तदाब आदींवरही परिणाम होतो. गरोदर मातेच्या मुलावरही परिणाम होतो.