शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

घरापेक्षाही ऑफिसमध्ये जास्त आनंदी राहतात महिला - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 10:15 AM

नोकरी करणारे जास्तीत जास्त लोक हे घरापेक्षा जास्त वेळ कामाच्या ठिकाणी म्हणजेच ऑफिसमध्ये घालवतात.

(Image Credit : bellanyc.com)

नोकरी करणारे जास्तीत जास्त लोक हे घरापेक्षा जास्त वेळ कामाच्या ठिकाणी म्हणजेच ऑफिसमध्ये घालवतात. मात्र अनेकजण हे ऑफिसला तणावाची जागा मानतात आणि सायंकाळी घरी परतण्याची सतत वाट बघत बसलेले दिसतात. पण या प्रसिद्ध धारणेच्या अगदी उलटा विचार अमेरिकेत करण्यात आलेल्या एका शोधातून समोर आला आहे. अमेरिकेतील पेन स्टेट यूनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, काही लोकांना खासकरुन महिलांना घराच्या तुलनेत ऑफिसमध्ये कमी तणाव जाणवतो. हे वाचून तुम्हीही विचारात पडला असाल..पण हे खरंय. चला जाणून घेऊ काय सांगतो रिसर्च...

कसा केला अभ्यास?

(Image Credit :MeaningfulWomen.com)

हा रिसर्च करणाऱ्या अभ्यासकांनी आठवडाभर यात सहभागी झालेल्या १२२ लोकांच्या कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हॉर्मोन्सच्या प्रमाणाची तपासणी केली आणि सोबतच त्यांना दिवसातील वेगवेगळ्या वेळेत त्यांचा मूड कसा होता, यावर रेटींग द्यायला सांगण्यात आलं. या रिसर्चनच्या निष्कर्षातून हे समोर आलं की, काही लोक घराच्या तुलनेत ऑफिसमध्ये कमी तणावात दिसले. 

पुरुषांबाबत हे उलटं

या विषयावर जेव्हा गंभीरतेने विचारपूस केली तेव्हा अभ्यायकांना असं आढळलं की, महिला ऑफिसमध्ये घरच्यापेक्षा जास्त आनंदी-खूश राहतात. तर पुरुष हे ऑफिसपेक्षा जास्त घरी आनंदी असतात. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीतही हे परिणाम एकसारखे बघायला मिळाले. 

काय आहे याची कारणे?

(Image Credit : www.workingmother.com)

अभ्यासकांच्या सांगण्यानुसार, जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे कामातून मिळणारं समाधान हे याचं महत्त्वाचं कारण आहे. असे बघायला मिळते की, महिलांना जी नोकरी पसंत येत नाही, ती त्या सहजपणे सोडतात आणि अशी नोकरी निवडतात ज्यात त्यांना आनंद मिळेल. तेच पुरुषांबाबत हे उलटं आहे. ते त्यांना न आवडणारी नोकरीही करतच राहतात. त्यांना कळत असतं की, यातून आनंद मिळत नाही तरी ते ती नोकरी सोडण्यासाठी धडपड करताना दिसत नाही. पण महिला लगेच याबाबत निर्णय घेतात. या रिसर्चमध्ये पुढे सांगण्यात आलं आहे की, आई असणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या महिला त्या महिलांच्या तुलनेत कमी तणावात असतात, ज्यांना मुलं-बाळं नसतात. 

कमी तणाव कधी?

(Image Credit : www.dailyexcelsior.com)

तुम्ही या गोष्टीचा अंदाज लावू शकता का की, आठवड्याच्या कोणत्या दिवशी लोक सर्वात कमी तणावात असतात? याचं योग्य उत्तर आहे वीकेंड. या रिसर्चमध्ये सहभागी लोकांना वीकेंड दरम्यान सर्वात कमी तणाव असल्याचं आढळलं. अर्थातच वीकेंडला लोकांच्या डोक्यावर कामाचं कोणतही टेन्शन नसतं. 

एक्सपर्ट काय सांगतात?

या अभ्यासाबाबत एक्सपर्ट्सचं मत आहे की, ऑफिसमध्ये महिला केवळ आपल्या कामावर फोकस करतात आणि त्यामुळे त्यांना ऑफिसमध्ये कमी तणाव जाणवतो. पण जेव्हा त्या घरी परततात तेव्हा त्यांना घरातील कामांसाठी सेंकड शिफ्ट सुरु करावी लागते. तसेच वेगवेगळी कामे करावी लागतात. त्यामुळेच त्यांचा तणाव वाढतो. त्यामुळेही त्यांना घरापेक्षा ऑफिसमध्ये जास्त आनंद मिळत असावा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWomenमहिला