गर्भधारणा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा आणि नाजूक टप्पा असतो. यात काही शंका नाही की स्त्रीच्या गरोदरपणात तिला दोन वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारण प्रत्येक गर्भधारणा एकमेकांपासून वेगळी असते. गर्भधारणेदरम्यान लक्षणांपासून मूड स्विंग्स आणि प्रसूती पद्धतींपर्यंत सर्व काही बदलू शकते. परंतु गर्भधारणेशी संबंधित आणखी एक समस्या ज्याबद्दल यापूर्वी कधीही चर्चा केली नव्हती. पण आता पोस्टपार्टम डिप्रेशन (Postpartum Depression) जन्मापश्चात उदासीनता, म्हणजेच मुलाला जन्म दिल्यानंतर आईचं डिप्रेशन ही नवीन समस्या मोठया संख्येनं मातांना जाणवत आहे. एका नवीन संशोधनाच्या मते, गर्भवती महिलेची वर्षाच्या कोणत्या महिन्यात प्रसूती होते यावर अवलंबून असतं स्त्रीला नैराश्याला सामोरे जावे लागेल की नाही.
उन्हाळा, शरद ऋतूत जन्माला आलेल्या मुलांच्या मातांचा डीप्रेशनचा धोका जास्त
टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार संशोधकांनी जून २०१५ ते २०१७ मध्ये बाळांना जन्म दिलेल्या २० हजार महिलांवर अभ्यास केला होता. अभ्यासानुसार ज्या महिलांनी हिवाळा (Winter) आणि वसंत ऋतूत आपल्या बाळाला जन्म दिला होता. त्यांच्यात पोस्टपार्टम डिप्रेशनचा धोका कमी होता. तुलनेने उन्हाळ्यात (Summer) आणि शरद ऋतूत (Autumn or Fall) बाळाला जन्म दिलेल्या मातांमध्ये डिप्रेशनचा धोका जास्त होता.
अमेरिकन सोसायटी ऑफ एनेस्थीसियोलॉजिस्ट्सच्या संशोधकांनी हा अभ्यास सादर केला होता. त्यांनी सांगितले की, कोणत्याही महिन्यात बाळाला जन्म देताना जोखिम नसते. पण त्यामुळे अनेक माता या डिप्रेशनचा सामना करू शकतात. ज्यात आईचं वजन वाढणं, डिलिव्हरी दरम्यान एपिड्यूरल (Epidural) चा वापर तसंच बाळ गर्भात किती दिवस राहते याचाही परिणाम होत असतो.
जन्माचा महिना आणि डिप्रेशनचा काय संबंध?
उन्हाळा किंवा शरद ऋतूत बाळाला जन्म देत असलेल्या महिलांना डिप्रेशनचा सामना करावा लागतो. कारण अनेक महिन्यांपासून या महिला घराच्या बाहेर निघालेल्या नसतात. सुर्याचा प्रकाश न मिळाल्यामुळे व्हिटामीन डी (Vitamin D deficiency) च्या कमतरतेचा सामना करावा लागतो. व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे डिप्रेशनचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा मातांना कल्पनाही नसते की, त्या पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये आहेत. बापरे! मासिक पाळीदरम्यान तरूणीच्या डोळ्यातून आले रक्ताचे अश्रू; समोर आला 'हा' दुर्मिळ आजार
पोस्टपार्टम डिप्रेशनची लक्षणं
पोस्टपार्टम डिप्रेशन एक गंभीर समस्या आहे. अनेकदा ही समस्या डिलिव्हरीनंतर सुरू होते. जवळपास ४ ते ६ आठवड्यांपर्यंत या समस्येचा सामना करावा लागू शकतो. काहीवेळी गरोदरपणाच्या काही दिवसात या प्रकारच्या त्रासाचा सामना करावा लागू शकतो. भूक न लागणं, रडायला येणं, प्रमाणापेक्षा जास्त थकवा जाणवणं, चिंता वाटणं, झोप न येणं, सतत राग येणं, लहान बाळासह भावनिक जवळीक नसणं ही या प्रकारच्या डिप्रेशनची लक्षणं आहेत. सावधान! जास्तवेळ बसून काम केल्यानं कमी वयातच होऊ शकतो कमरेचा आजार; या उपायांनी मिळवा आराम