प्रोटीन (protein) शरिरात गेले नाही तर निरोगी कसे राहाल? यासाठी बरेचदा तुम्हाला मांसाहार करा असा सल्ला दिला जातो. मांसाहार मध्ये पुरेपुर प्रोटीन आहेच पण निरोगी राहण्यासाठी मांसाहार करण्याची सक्ती अजिबातच नाही. शाकाहारही शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तेवढाच फायदेशीर आहे.त्वचा, केस, हाडे, स्नायू यांना बळकटी देण्यासाठी शरिरात मुबलक प्रमाणात प्रोटीन असणे आवश्यक आहे. प्रोटीनमधअये अमिनो अॅसिड असते जे शरीर मजबूत ठेवते. यासाठीच जाणून घ्या कोणत्याकोणत्या शाकाहारी पदार्थांमुळे तुमचे शरीर निरोगी आणि स्वस्थ राहील.
दुग्धजन्य पदार्थ
दूध हा स्वत:मध्येच एक पोषक आहार आहे. दुधात कॅल्शियम तर असतेच मात्र प्रोटीनही मुबलक प्रमाणात असते. मांसाहारासाठी उत्तम पर्याय म्हणून पनीर. पनीर हे बहुतेक जणांना आवडतंही. त्यामुळे चिकन, मासे जरी खात नसाल तरी दुग्धजन्य पदार्थांनी तुम्ही प्रोटीन मिळवू शकता.
सोयाबीन
सोयाबीनही प्रोटीनचा मोठा स्त्रोत आहे. दैनंदीन जीवनातील प्रोटीनची कमतरता सोयाबीनमुळे पूर्ण होऊ शकते. सोयाबीन शिजवण्यासाठी काहीसा वेळ लागतो. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीनचा साठा मिळतो.
डाळ
वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी खाल्ल्याने प्रोटीनची कमतरता दूर होते. यातही तूर डाळ प्रोटीनयुक्त आहे. याशिवाय मुगाची डाळ, मसुर डाळ, राजमा खाल्ल्यानेही प्रोटीन शरिरात जाते. नियमित भातावर वेगवेगळ्या डाळींची आमटी करुन खातात. यातुन डाळी पोटात जाण्यास मदत होते.
शेंगदाणे/बदाम
शेंगदाण्यांमध्ये प्रोटीनचा पुष्कळ साठा आहे. जेवणात अनेक पदार्थांमध्ये आपण शेंगदाण्यांचा वापर करतो. पोहे, उपमा या नाश्त्याच्या पदार्थांमध्ये आवर्जुन शेंगदाणे घातले जातात. मात्र शेगदाण्यांचा अतिरेकही नको. तर प्रोटीनसाठी केव्हाही फायदेशीर आहे ते म्हणजे बदाम. नियमित बदाम खाल्ल्याने तुम्हाला कधीच प्रोटीनची कमतरता भासणार नाही.