शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

मराठीशी नाळ तोडणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:06 AM

प्रथमच एकत्र काम करणारे सचित पाटील आणि स्वप्नील जोशी 'फ्रेंड्स'मध्ये 'करण' आणि 'नील' या मित्रांच्या...

प्रथमच एकत्र काम करणारे सचित पाटील आणि स्वप्नील जोशी 'फ्रेंड्स'मध्ये 'करण' आणि 'नील' या मित्रांच्या भूमिकेत आहेत. नील शांत, सरळ, तत्व-मुल्य जपणारा तर करण याच्या एकदम उलट अँग्री यंग मॅन. सचितबद्दल बोलताना तो म्हणाला, 'एकत्र काम करण्याची दोघांची इच्छा होती. 'फ्रेंड्स'मुळे ते शक्य झाले. सचित मित्रच असल्याने त्याच्यासोबत काम करताना खूप मजा आली. सेटवर त्याच्यामुळे वातावरण एकदम पॉझिटिव्ह होऊन जायचे.' इमोशन्सला भाषेची चौकट नसतेमधेश यांना मराठी येत नसल्यामुळे सेटवर मराठी, इंग्लिश आणि तमिळ भाषेतून स्क्रीप्ट असायची. दिग्दर्शकालाच मराठी येत नाही म्हटल्यावर स्वप्नील जरा दचकलाच होता. हा किस्सा सांगताना तो म्हणाला, 'मी संजयकडे आश्‍चर्याने पाहिले आणि आर. मधेश मला म्हणाले, तुला पंजाबीमधून हसता, मराठीतून रडता, गुजरातीतून प्रेम करता येते का? नाही ना. मला जरी मराठी भाषा येत नसली तरी मला भावना कळतात आणि त्यासाठी भाषेचे बंधन नाही. तेव्हा मला वाटले हा दिग्दर्शक परफेक्ट आहे.' मराठी कथेला दाक्षिणात्य तडकारजनीकांत-दीपिका पदुकोन अभिनित 'कोचिदायान' चित्रपटाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर आर. मधेश 'फ्रेंड्स'द्वारे मराठी सिनेसृष्टीत पहिले पाऊल ठेवत आहेत. संजय केलापुरे यांनी सांगितले की, 'साऊथचा एवढा मोठा दिग्दर्शक मराठी नाटकांनी प्रभावित होऊन मराठी चित्रपटांत काम करतोय ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. 'रोबोट', 'शिवाजी द बॉस' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक शंकर यांचे ते बंधू आहेत. चित्रपटात साऊथ स्टाईलची अँक्शन आहे; मात्र, गाभा पूर्णपणे मराठी आहे. तांत्रिकदृष्ट्या अतिशय उत्कृष्टता आणि भव्यता ही चित्रपटाची युएसपी आहे.' आतून पुश मिळालास्वप्नील जोशीसोबत काम करण्याचा अनुभव एकदम अमेझिंग होता. आतापर्यंत मी टीव्ही सिरियल्स केल्या आहेत आणि मोठय़ा पडद्यावर 'फ्रेंड्स'मधून येण्याची संधी मिळाल्याने आत्मविश्‍वास वाढला आहे. आता १५ जानेवारीची वाट पाहतेय!!- गौरी नलावडे संभाजी राजांची भूमिका साकारायला आवडेलमला जर कधी ऐतिहासिक भूमिका करायची असेल तर ती संभाजी राजांची असावी अशी माझी इच्छा आहे. मी रोलसाठी शोभून दिसेल की नाही ती वेगळी गोष्ट; पण मला ती साकारण्याचे स्वप्न आहे. हिंदी चित्रपट केले तरी मराठीत काम करणे कधीच थांबवणार नाही.- स्वप्नील जोशी मैत्री की आणखी काही : हा एकच सवालचित्रपटाच्या कथेबाबत स्वप्नील आणि गौरी दोघांनाही सस्पेन्स बाळगला. तो म्हणाला, 'ही दोन मित्रांची कथा आहे. जीवाला जीव देणारे हे मित्र. परंतु काही परिस्थतीमुळे त्या दोघांवर मैत्री की 'आणखी काही' यांपैकी एकाची निवड करण्याची वेळ येते. ते हे 'आणखी काही' काय आहे यासाठी तर सिनेमाच पाहावा लागेल.' गौरी म्हणाली, 'चित्रपटाचा हा टर्निंग पॉईंट खरोखरच सर्व प्रेक्षकांसाठी अनोखा असेल. त्यामुळे त्याबद्दल अधिक सांगतले तर मजाच निघून जाईल.' फ्रेंड्स : मैत्रीचा एक वेगळाच अँगलअलिकडच्या काळात मराठीत कॉलेजच्या फ्रेंडशिपविषयी अनेक चित्रपट आले. मात्र स्वप्नील म्हणतो, फ्रेंड्स यांपेक्षा एकदम वेगळा आह. मैत्री रसायनच असे आहे की, किती तरी वेगळ्या अँगलने तिच्याकडे पाहता येते. आमच्या चित्रपटातही असाच एक वेगळा अँगल आहे. प्रत्येक मैत्री युनिक असते. प्रत्येक दोन मित्रांचे इक्वेशन्स वेगळे असतात. या चित्रपटातून मैत्रीची नवीन कथा पाहायला मिळेल. महाराष्ट्राचा सुपरस्टार, मराठीचा चॉकलेट बॉय म्हणून स्वप्नील जोशीची ओळख आहे. त्याच्या प्रत्येक नवीन चित्रपटची केवळ चाहतेच नाही तर सर्व प्रेक्षकही आतूरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे आगामी 'फ्रेंड्स' चित्रपटाची क्रेझ तमाम महाराष्ट्रात नसती तरच नवल! प्रदर्शनाची तारीख (१५ जानेवारी) जसजशी जवळ येत आहे तशी उत्सुकता आणखी वाढतच आहे. या निमित्त स्वप्नील जोशी, गौरी नलावडे आणि निर्माता संजय केलापुरे यांनी औरंगाबाद 'लोकमत' कार्यालयाला भेटी दिली. या दरम्यान चित्रपटाचा विषय, आशय, सेटवरची धमाल, दंगा मस्तीविषयी खुसखुशीत गप्पा रंगल्या. त्याचाच हा धावता आढावा.. photo source - Marathi stars.com