शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अभ्यासातून धक्कादायक खुलासा! ध्वनीप्रदुषणामुळे ६० मिलियन भारतीयांच्या श्रवणक्षमतेवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 3:31 PM

भारतात ध्वनिप्रदूषणामुळे (Noise Pollution) श्रवणशक्ती कमी होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचा धक्कादायक खुलासा संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) अहवालात करण्यात आला (Noise Pollution and Hearing Problem) आहे.

सातत्याने वाढणारे ध्वनी प्रदूषण हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. सतत वाढत जाणारी रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक, रेल्वे, यंत्रसामग्री, उद्योग आणि खूप मोठ्या आवाजात संगीत ऐकणे हे ध्वनी प्रदूषणाचे प्रमुख घटक मानले जातात. आता भारतात ध्वनिप्रदूषणामुळे (Noise Pollution) श्रवणशक्ती कमी होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचा धक्कादायक खुलासा संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) अहवालात करण्यात आला (Noise Pollution and Hearing Problem) आहे.

या अहवालानुसार, भारतातील ६३ दशलक्ष लोकांची श्रवणशक्ती कमी होत आहे. इतकेच नाही तर, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) द्वारे जारी केलेल्या वार्षिक 'फ्रंटियर्स रिपोर्ट २०२२ (Frontiers 2022: Noise, Blazes and Mismatches)' मध्ये भारतातील मुरादाबाद शहराला जगातील दुसऱ्या क्रमांकाचे ध्वनी प्रदूषित शहर घोषित केलं आहे.

तरुण वेगाने श्रवणशक्ती गमावत आहेतदैनिक हिंदुस्थान वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की, ध्वनी प्रदूषणामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. विशेषत: यामुळे भारतातील तरुणांची श्रवणशक्ती (Hearing Ability) झपाट्याने कमी होत आहे. असेच होत राहिल्यास २०३० पर्यंत भारतातील श्रवणदोषांची संख्या दुप्पट म्हणजे १३० दशलक्षांपेक्षा जास्त होईल. या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, भारतातील १० पैकी फक्त दोन लोक या समस्येवर उपचार घेतात आणि श्रवणयंत्र वापरतात.

जगातील १ अब्ज लोकांची श्रवणशक्ती कमी झालीअहवालात असे म्हटले आहे की, मोठ्या आवाजातील संगीत आणि मनोरंजनाच्या इतर साधनांद्वारे दीर्घकाळापर्यंत आवाज कानावर पडल्याने जगभरातील १२ ते ३५ वयोगटातील सुमारे एक अब्ज लोकांच्या श्रवणशक्तीला धोका निर्माण होत आहे. जगभरातील सुमारे दीड अब्ज लोक कमी श्रवणशक्तीसह जीवन जगतात. ताज्या अंदाजानुसार, २०३० पर्यंत ही संख्या दोन अब्जांपेक्षा जास्त होऊ शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स