आजकाल बहुतेक घरांमध्ये नॉन स्टिक भांडी वापरली जातात. नॉन स्टिक भांडी स्वच्छ करणं सोपं आहे. पण नुकत्याच झालेल्या रिसर्चमुळे या भांड्याबाबत चिंता वाढली आहे. नॉन-स्टिक पॅनमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, असं सांगण्यात आलं आहे.
विशेषत: विशिष्ट प्रकारच्या टेफ्लॉल फ्लूचा धोका वाढला आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, यूएस पॉइजन सेंटर्सने गेल्या २० वर्षांत "पॉलिमर फ्यूम फिव्हर" चे ३६०० हून अधिक रिपोर्ट नोंदवले आहेत. नॉन स्टिक पॅन कोटिंग्स संबंधित फ्लूसारखा आजार आहे. २०२३ मध्ये नॉन स्टिक पॅनमुळे होणाऱ्या आजाराची २६७ प्रकरणे आढळून आली. जी खूप जास्त आहेत.
टेफ्लॉन फ्लू म्हणजे काय?
टेफ्लॉन फ्लू, याला पॉलिमर फ्यूम फिव्हर असंही म्हणतात. गरम टेफ्लॉन (PTFE) मधून निघणारा धूर श्वास घेतल्यावर शरीरात जातो. उच्च तापमानात टेफ्लॉनने बनवलेल्या कूकवेअरच्या वापराशी तो संबंधित आहे.
टेफ्लॉन फ्लूची कारणं
'टेफ्लॉन फ्लू' याला पॉलिमर फ्युम फिव्हर असंही म्हणतात. नॉनस्टिक कूकवेअर जास्त गरम केल्यामुळे होतो. जेव्हा नॉनस्टिक पॅन, विशेषत: पॉलीटेट्राफ्लुओरोइथिलीन (PTFE) पासून बनविलेले, सामान्यतः टेफ्लॉन म्हणून ओळखले जाते, ५००°F (२६०°C) पेक्षा जास्त तापमानाला गरम केले जाते तेव्हा त्यातून धूर येतो. या धुरात परफ्लुओरोक्टॅनोइक ऍसिड (PFOA) आणि इतर फ्लोरिनेटेड सारखी विषारी रसायनं असतात. जे श्वास घेतल्यास हानिकारक ठरू शकतात.
टेफ्लॉन फ्लूची लक्षणं
- डोकेदुखी- थंडी वाजणं- ताप- मळमळ- छातीत जडपणा जाणवणं.- खोकला- घसा खवखवणे
ही लक्षणे सहसा संपर्कात आल्यानंतर काही तासांनी दिसतात आणि काही दिवस शरीरात राहू शकतात. ही स्थिती सहसा गंभीर नसली तरी ती अस्वस्थ आणि चिंताजनक असू शकते.