शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

हिवाळ्यात वेगाने पसरतो हा Norovirus, जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 12:22 PM

हिवाळ्यात खोकला, सर्दी, पडसा, घसा खराब होणे आणि ताप येणे अशा समस्या सामान्य आहेत. त्यामुळेच सतत सल्ला दिला जातो की, थंडीपासून बचाव करा.

(Image Credit : abcnews.go.com)

हिवाळ्यात खोकला, सर्दी, पडसा, घसा खराब होणे आणि ताप येणे अशा समस्या सामान्य आहेत. त्यामुळेच सतत सल्ला दिला जातो की, थंडीपासून बचाव करा आणि असे पदार्थ खावेत ज्याने तुमचं शरीर गरम राहील. पण एक हिवाळ्यात होणारं एक असं इन्फेक्शन आहे जे वेगाने पसरतं आणि शरीराला प्रभावित करतं. या इन्फेक्शनचं नाव आहे Norovirus.

काय असतं हे Norovirus इन्फेक्शन?

(Image Credit : emedicinehealth.com)

Centres for Disease Control and Prevention-CDC नुसार, Norovirus ने फार जास्त संक्रमण होतं. त्यामुळे व्यक्तीला उलट्या आण डायरियाची समस्या होऊ शकते. तसं तर हे संक्रमण कोणत्याही महिन्यात होऊ शकतं, पण हिवाळ्यात हे संक्रमण अधिक वेगाने पसरतं. हा व्हायरस कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही ऋतूमध्ये हल्ला करू शकतो. हा व्हायरस जेवणातून किंवा पाण्याच्या माध्यमातून पसरतो. तसेच संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेही हा व्हायरस पसरू शकतो. 

Norovirus ची लक्षणे

(Image Credit : medicalnewstoday.com)

- Norovirus ची सर्वात प्राथमिक लक्षणे आहेत डायरिया, उलट्या, जांबई येणे आणि पोटात दुखणे. तसेच फूड पॉयजनिंग सुद्धा होऊ शकतं.

- या व्हायरसचं संक्रमण झालं तर रूग्णाल ताप, अंगदुखी आणि डोकेदुखीची समस्या देखील होते.

(Image Credit : hcah.in)

- मांसपेशींमध्ये वेदना होणे आणि थंडी लागणे असंही होतं.

- Norovirus जेवणातून आणि पाण्यातून सहजपणे पसरतो. लहान मुलांची आणि वयोवद्धांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असल्याने त्यांना याची लागण लवकर होते.

Norovirus पासून बचाव

-  Norovirus शरीरात पाणी कमी झाल्यावर जास्त अॅक्टिव होतो. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नका आणि शुद्ध पाणी जास्तीत जास्त सेवन करा. इलेक्ट्रोलाइट्स आणि ओआरएसचं सेवन करावं.

- घरात स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी आणि संक्रमण झालं असेल तर घरातून बाहेर जाऊ नका.

- फळं आणि भाज्या चांगल्या धुवूनच खाव्यात.

- संक्रमण झालं असेल तर तुम्ही जेवण बनवू नका. 

Norovirus चं संक्रमण झाल्याची माहिती १२ ते ४८ तासात मिळते. तर रूग्णाला बरं होण्यासाठी १ ते ३ दिवसांचा वेळ लागतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य