High Cholesterol symptoms : आपल्या अनहेल्दी लाइफस्टाईमुळे आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयासंबंधी समस्या, मेंदूसंबंधी समस्या, डायबिटीस, कोलेस्ट्रॉलसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. तरूणांना सुद्धा कोलेस्ट्रॉलची समस्या होऊ लागली आहे.
तरूणांमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं फार नुकसानकारक ठरू शकतं. अशात जर २५ ते ३५ वयाच्या तरूणांमध्ये वाढत्या कोलेस्ट्रॉलची लक्षणं (High Cholesterol symptoms) दिसत असतील तर सतर्क राहण्याची गरज आहे. ती काय लक्षणं असतात हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
१) पायात थरथरी
जर व्यक्तीच्या पायांमध्ये थरथरी जाणवत असेल किंवा मुंगी चावल्यासारखं जाणवत असेल तर हे वाढत्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. असं तेव्हा होतं जेव्हा ऑक्सीजनयुक्त रक्त अवयवांमध्ये पोहोचू शकत नाही. त्यावेळी त्या अवयवयांमध्ये थरथरी जाणवू शकते.
२) अस्वस्थता आणि घाम
जेव्हा व्यक्तीला अस्वस्थता आणि घाम येत असेल तर हेही वाढत्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. जेव्हा रक्त पुऱेशा प्रमाणात हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही आणि हृदय कमी रक्त पंप करू लागतं तेव्हा अस्वस्थता आणि घाम यासारख्या समस्या निर्माण होतात.
३) डोळ्यांवर पिवळे डाग
जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांवर पिवळे चट्टे दिसत असतील तर हेही वाढत्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. असं तेव्हा होतं जेव्हा रक्तात फॅटचं प्रमाण वाढतं.
४) शरीरात वेदना
जेव्हा व्यक्तीची मान, जबडा, पोट आणि पाठ दुखत असेल तर हेही वाढत्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. याकडे दुर्लक्ष केलं तर पुढे समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
वाढत्या कोलेस्ट्रॉलच्या लक्षणांकडे लोक नेहमीच सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करतात. पण यामुळे व्यक्तीला इतर आणखीही काही समस्यांचा सामना करावा लागतो. अशात वेळीच उपचार करणं गरजेचं असतं. हार्वर्ड मेडिकल स्कूलनुसार, जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलमुळे हृदयासंबंधी रोगांचा धोका कमी करायचा असेल तर तुम्ही रेड मीट, तळलेले पदार्थ, प्रोसेस्ड मीट आणि बेक्ड पदार्थांचं सेवन कमी करावं लागेल. आश्चर्याची बाब म्हणजे लोक माहीत असून सुद्धा हे पदार्थ आवडीने खातात.
रेड मीट
रेड मीटला नेहमीच कोलेस्ट्रॉलसाठी धोकादायक मानलं जातं. हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांना नेहमीच रेड मीट न खाण्याचा सल्ला दिला जातो. एक्सपर्ट सांगतात की, तुम्ही मांस खाणं पूर्णपणे टाळलं पाहिजे. प्रोटीनसाठी त्याऐवजी तुम्ही दुसरे पदार्थ खाऊ शकता.
प्रोसेस्ड मीट
एक्सपर्ट कोलेस्ट्रॉलच्या रूग्णांना प्रोसेस्ड फूड न खाण्याचाही सल्ला देतात. प्रोसेस्ड मीटमध्ये कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे समस्या अधिक वाढू शकते.
कोलेस्ट्रॉल वाढवतात बेक्ड फूड
अनेक लोकांसाठी कुकीज आणि पेस्ट्री सर्वात स्वादिष्ट पदार्थ असतील. अनेकजण नाश्त्यात हे पदार्थ नियमितपणे खात असतील. एक्सपर्ट्सनी इशारा दिला आहे की, लोणी, शॉर्टिंग आणि शुगरचं अधिक प्रमाणात सेवन करणं मानवी शरीरासाठी चांगलं नाही. जर तुम्ही आधीच कोलेस्ट्रॉलचे रूग्ण असाल तर तुम्ही हे पदार्थ पूर्णपणे टाळले पाहिजे.
फ्राइड फूड
बऱ्याच लोकांना कुरकुरीत तळलेले पदार्थ खाणं खूप आवडतं. तज्ज्ञांनी तळलेल्या पदार्थांबाबत इशारा दिला आहे. एक्सपर्ट सांगतात की, डीप फ्राय केल्याने पदार्थातील उर्जा घनत्व आणि कॅलरीचं प्रमाण वाढतं. तज्ज्ञ पदार्थ तळण्यासाठी एअर फ्रायर किंवा चांगलं तेल वापरण्याचा सल्ला देतात.