Monsoon Best Vegetables : पावसाळ्यात बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात. पण या सगळ्यात भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात असं नाही. या दिवसांमध्ये अनेक भाज्यांवर रोगराई असते ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. पण अशाही काही भाज्या असतात ज्या तुमचा अनेक आजारांपासून बचाव करतात. अशाच तीन फायदेशीर भाज्यांबाबत न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी एका व्हिडिओद्वारे सांगितलं आहे.
न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांच्यानुसार, पावसाळ्यात या भाज्यांचं नियमित सेवन केलं तर शरीराला भरपूर व्हिटॅमिन्स, मिनरल्स, पोषक तत्व, डायटरी फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स मिळतात. या भाज्यांमुळे तुमची इम्यूनिटीही वाढते ज्यामुळे शरीराला अनेक इन्फेक्शन आणि आजारांपासून बचाव होतो.
पावसाळ्यात आवर्जून खाव्या अशा 3 भाज्या
1) लौकी म्हणजेच दुधी भोपळा
दुधी भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि के भरपूर प्रमाणात असतं. व्हिटॅमिन सी मुळे शरीरातील पेशींची वाढ, दुरूस्ती होते. तसेच या भाजीने शरीरात कोलेजन वाढतं, हाडे मजबूत होतात, दात मजबूत होतात, आयर्नचं अवशोषण वाढतं आणि इम्यूनिटी मजबूत होते. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक आहे. तसेच याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.
2) कारले
कारल्याची भाजी अनेकजण खूप आवडीने खातात. कारल्याच्या भाजीचं नियमित सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. या भाजीमध्ये शरीरातील सूज कमी करण्याचेही गुण असतात. कारले त्वचेसाठीही खूप फायदेशीर असतात. याने त्वचेवरील सुरकुत्या दूर होतात आणि त्वचा तजेलदार दिसते. त्वचेच्या अनेक इन्फेक्शनचा धोकाही यामुळे कमी होतो.
3) शेवगा
शेवग्याच्या शेंगा, पाने आणि फुलांना आयुर्वेदात फार महत्व आहे. याच्या नियमित सेवनाने कितीतरी आजारांचा धोका टाळता येऊ शकतो आणि कितीतरी आजार दूर केले जाऊ शकतात. या भाजीमधून तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळतं. तसेच यात अमीनो अॅसिड, बीटा कॅरेटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम, कार्बोहाइड्रेट, फॉस्फोरस, जिंकसारखे मिनरल्स आणि वेगवेगळे फीनॉलिक असतात. तसेच यात वेगवेगळे व्हिटॅमिन्सही असतात.
शेवग्याच्या शेंगांचे नियमितपणे सेवन करून तुमची हाडे मजबूत होतात, रक्त शुद्ध होतं, श्वासासंबंधी समस्या दूर होतात, इन्फेक्शनपासून बचाव होतो, वजन कमी होतं आणि तुम्ही तरूण दिसता.