Hair Care: केसगळती ही एक अनेकांना होणारी एक सामान्य समस्या झाली आहे. अशात लोक केसगळती रोखण्यासाठी वेगवेगळे केमिकल्स किंवा उत्पादनांचा वापर करतात. पण याने केसगळती थांबतेच असं नाही. उलट या उत्पादनांचे साइड इफेक्ट्स दिसू लागतात. अनेकदा शरीरात पोषक तत्व कमी झाल्यामुळे केसगळतीची समस्या होते. मात्र, आज आम्ही तुम्हाला एक असं ड्रिंक सांगणार आहोत ज्याचं सेवन करून तुम्ही केसगळतीची समस्या दूर करू शकता.
न्यूट्रिशनिस्ट नुपुर पाटील यांनी केसगळती थांबवणाऱ्या एका ड्रिंकबाबत सांगितलं आहे. ते कसं तयार करावं हेही त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्यानुसार, हे ज्यूस पिऊन केसगळती तर थांबेलच सोबतच केस खूप जास्त मुलायम होतील.
केसगळती थांबवणारं ज्यूस
न्यूट्रिशनिस्टनुसार, हे ज्यूस तयार करण्यासाठी अर्धा गाजर, एक सेलेरी क, 7 ते 8 कढीपत्ते, अर्धा आवळा, एक काकडी, थोडं आलं, अर्धा हिरवा सफरचंद आणि काही शेवग्याची पाने घ्या.
या सगळ्या गोष्टी मिक्स करा आणि पाणी टाकून ब्लेंड करा. यात अर्धा लिंबू पिळा आणि पिऊन घ्या. हा ज्यूस टेस्टी तर लागतोच सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. हा ज्यूस 3 ते 4 महिने रोज सेवन करा. याने केसगळती थांबेल आणि शरीराला सुद्धा भरपूर पोषण मिळेल.
केसगळती थांबवण्यासाठी इतर उपाय
केसगळती थांबवण्यासाठी आणि नवीन केस यावे यासाठी वरील ज्यूससोबतच तुम्ही इतरही काही टिप्स वापरू शकता. एक्सपर्ट सांगतात की, बायोटिन, व्हिटॅमिन ई आणि ओमेगा सप्लीमेंट्स घेऊन केसगळतीची समस्या दूर होऊ शकते. त्याशिवाय आवळा, सीड्सचं सेवन फायदेशीर ठरतं. केसांची मालिश करण्यासाठी रोजमेरी तेलाचा वापर करावा. रोजमेरी तेल आठवड्यातून 2 वेळा केसांना लावू शकता.