Cholesterol Diet: चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, चुकीची लाइफस्टाईल आणि शारीरिक हालचाल न केल्याने अनेकांना हाय कॉलेस्ट्रोलची समस्या खूप होत आहे. कॉलेस्ट्रोल मेणासारखा एक चिकट पदार्थ असतो जो रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो, ज्यामुळे रक्त पुरवठा सुरळीत होत नाही. अशात हार्ट अटॅकचा धोका वाढतो. त्यामुळे वेळीच कॉलेस्ट्रोल कमी करण्यासाठी उपाय केले पाहिजे. कॉलेस्ट्रोल वाढल्यावर ते कमी करण्यासाठी आहाराची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं. काय खावं काय खाऊ नये याची काळजी घ्यावी लागते.
न्यूट्रिशनिस्ट सिमरन चोप्रा यांनी इन्स्टावर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्यानुसार कॉलेस्ट्रोल वाढलेलं असताना काही खास गोष्टींचं सेवन केलं पाहिजे तर काही गोष्टी टाळल्या पाहिजे.
कॉलेस्ट्रोल असताना काय खावं?
- बॅड कॉलेस्ट्रोल शरीरात वाढलेल्या लोकांना आहारात भरपूर फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. हाय फायबर फूड्समध्ये कडधान्य, मिलेट्स, बार्ली आणि ओट्स खाल्ल्याने फायदा मिळतो. सोबतच फायबर असलेली फळंही खाऊ शकता. रोजच्या जेवणात फायबर असलेलं एक तरी फूड असावं.
- पेक्टिन असलेली फळं कॉलेस्ट्रोल लेव्हल कमी करण्यास मदत करतात. पेक्टिन एकप्रकारचं सोल्यूबल फायबर आहे जे हाय कॉलेस्ट्रोल लेव्हल नॅचरलपणे कमी करतं. यासाठी तुम्ही सफरचंद, द्राक्ष स्ट्रॉबेरीज आणि सिट्रस फ्रूट्स म्हणजे आंबट फळं खाऊ शकता.
- तसेच तुम्ही ओमेगा ३ फॅटी अॅसिड असलेल्या फूड्सचं सेवन करू शकता. ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे कॉलेस्ट्रोल कमी होतं.
काय खाऊ नये?
- हाय कॉलेस्ट्रोलची समस्या असलेल्या लोकांना चिकन स्किन खाणं टाळलं पाहिजे. डीप फ्राय चिकन स्किन अजिबात खाऊ नये.
- तळलेले, भाजलेले पदार्थ पूर्णपणे टाळलं पाहिजे. तेल आहारात कमी वापरावं.
- लाल मांस आणि प्रोसेस्ड मीट खाणं टाळलं पाहिजे.