शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

१० किलो वजन कमी होण्याचा न्यूट्रिशनिस्टचा दावा, 'या' खास ज्यूसचं रोज करावं लागेल सेवन!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 9:42 AM

Weight Loss : आजकालची चुकीची लाइफस्टाईल, खाण्या वेळ न पाळणं, तळलेले मसालेदार पदार्थ खाणं, पुरेशी झोप न घेणे अशा गोष्टींमुळे अनेकांना ही समस्या होत आहे.

Weight Loss : वजन वाढणे किंवा पोटावरील चरबी वाढणे अशा समस्या आजकाल जास्तीत जास्त लोकांना होत आहेत. कमी वयातही लोक लठ्ठपणा किंवा जास्त वजनाचे शिकार होत आहेत. लठ्ठपणा वाढला तर शरीरात अनेक गंभीर आजार घर करतात. ज्यामुळे लोकांचं जगणं अवघड होतं. आजकालची चुकीची लाइफस्टाईल, खाण्या वेळ न पाळणं, तळलेले मसालेदार पदार्थ खाणं, पुरेशी झोप न घेणे अशा गोष्टींमुळे अनेकांना ही समस्या होत आहे.

इतकंच नाही तर वजन जास्त वाढल्याने डायबिटीस, हार्ट डिजीज, कॅन्सर, कमी दिसणे, स्मरणशक्ती कमजोर होणे, कंबरदुखी, आळस, थकवा अशा अनेक आजांराचा धोका असतो. अशात जर तुमचं वजन जास्त वाढलं असेल तर ते तुम्ही लगेच कमी करण्यावर भर दिला पाहिजे. तसे तर वजन कमी करण्याचे अनेक उपाय आहेत. पण आज आम्ही तुम्हाला एक नॅचरल उपाय सांगणार आहोत. न्यूट्रिशनिस्ट डॉ. शिखा सिंह यांच्यानुसार तुम्ही दूधी भोपळ्याचा ज्यूस पिऊन १० किलो वजन कमी करू शकता. 

डॉ. शिखा सिंह म्हणाल्या की, रोज आहारात एक ग्लास दूधी भोपळ्याच्या ज्यूसचा समावेश कराल तर तुम्हाला लवकर वजन कमी करण्यास मदत मिळेल. तुमच्या पोटावरील चरबी कमी होऊन पोट आत जाईल. सोबतच कंबरही बारीक होईल.

दूधी भोपळ्याच्या ज्यूसचे फायदे

न्यूट्रिशनिस्टनुसार, दूधी भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई भरपूर असतात. तसेच यात आयर्न, फोलेट, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमही असतं. हे एक चांगलं ड्यूरेटिक आहे जे वॉटर रिटेंशनमुळे होणाऱ्या लठ्ठपणापासून बचाव करतं.

दूध भोपळ्याच्या ज्यूसमध्ये भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि फायबर असतात. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. तसेच दूधी भोपळ्यामध्ये ९२ टक्के पाणी असतं. सोबतच याने लिव्हर डिटॉक्सही होतं. इतकंच नाही तर त्वचा आणि केसांनाही याचा फायदा मिळतो.

पचन चांगलं होतं

पचनक्रिया खराब झाल्याने फॅट वाढू लागतं. नंतर अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या होते. डायजेशन सुधारण्यासाठी दूधी भोपळ्याचा ज्यूसचं नियमित सेवन करावं.

कसा कराल तयार?

१ दूधी भोपळा चांगल्याप्रकारे धुवून घ्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करा. आता एका ज्यूसरमध्ये हे तुकडे टाकून त्यांचा ज्यूस बनवा. नंतर हा ज्यूस एका भांड्यात गाळून घ्या. या ज्यूसमध्ये थोडं काळं मीठ टाका. तसेच त्यात थोडां लिंबाचा रसही टाका. हे चांगलं मिक्स करून यांचं सेवन करा. दूधी भोपळा जर कडू लागत असेल तर त्याचा ज्यूस बनवू नका.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स