Weight Loss Diet in Summer : आजकाल चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे वजन वाढण्याची समस्या खूप वाढली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक एक्सरसाइज करतात आणि आहारात बदल करतात. पण सगळ्यांनाच याने फायदा होतो असं नाही. अशात आता एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, आहारात कॅलरी कंट्रोल करणारे नट्सचा समावेश केला तर वजन सहजपणे कमी करू शकता. यूनिवर्सिटी ऑफ साऊथ ऑस्ट्रेलियाच्या रिसर्चमधून याचा खुलासा करण्यात आला आहे.
वजन कमी करण्यासाठी काय करावे
या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी सांगितलं की, आहारात नट्सचा समावेश केल्याने वजन कमी करण्यासाठी मदत मिळते. प्रोफेसर एलिसन कोट्स म्हणाले की, नट्समध्ये पोषक तत्व भरपूर असतात. याच्या नियमित सेवनाने वजन कमी होतं. बरेच लोक जे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात ते नट्स खाणं बंद करतात. त्याचा समज असतो की, नट्समध्ये एनर्जी आणि फॅट असतं. जे वजन वाढवू शकतं. पण हा समज चुकीचा आहे.
रिसर्चमधून काय आढळलं
अभ्यासकांना आढळलं की, चारपैकी ज्या लोकांनी ४२-८४ ग्रॅम नट्स आहार म्हणून देण्यात आले त्यांचं वजन इतरांच्या तुलनेत जास्त कमी झालं. नट्सच्या सेवनाने वजन १.४ ते ७.४ किलो कमी झालं.
प्रोफेसर कोट्स म्हणाले की, जर तुम्हालाही वाटत असेल तर नट्स खाल्ल्याने वजन वाढू शकतं असं अजिबात नाहीये. नट्समुळे वजन वाढत नाही. उलट यांनी वजन कमी करण्यास मदत मिळते. रिसर्चचे सह-लेखक डॉ शारायाह कार्टर यांनी सांगितलं की, असे लोक ज्यांना नट्स खाणं आवडतं त्यांच्या आरोग्यात खूप सुधारणा होऊ शकते. अभ्यासकांनी वजन वाढण्याची चिंता सोडून नट्स खाण्याचा सल्ला दिला आहे.