काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, जर तुम्ही योग्य प्रकारे एक्सरसाइज केली तर आपलं शरीर आणि आपल्या भावनांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. एवढचं नाहीतर लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त असणाऱ्या लोकांसाठी व्यायाम करणं वरदान ठरतं. तसेच त्यांच्या मेंदूसाठीही व्यायाम करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. संशोधनामधून सिद्ध झाल्यानुसार, लठ्ठपणाने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूपर्यंत इन्सुलिन पोहोचू शकत नाही. खरं तर इन्सुलिन मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. हे मेंदूला शरीराच्या इतर भागांत असलेल्या न्यूट्रिशन आणि वेलनेसबाबत माहिती देतं.
संशोधनादरम्यान, लठ्ठपणाने ग्रस्त असणाऱ्या 31 सामान्य लोकांसोबत लठ्ठपणाने ग्रस्त असणाऱ्या त्या 22 लोकांनादेखील सहभागी केलं होतं. ज्यांना जास्त वजनामुळे चालणं फिरणंदेखील अशक्य झालं होतं. सहभागी करण्यात आलेल्या सर्व लोकांचे संशोधनाच्या आधी आणि संशोधनानंतर दोन वेगवेगळे ब्रेन स्कॅन करण्यात आले. त्यानंतर 8 आठवड्यांपर्यंत सुरू असलेलं संशोधन आणि एक्सरसाइज सेशननंतर पुन्हा त्यांचे दोने वेगवेगळे ब्रेन स्कॅन करण्यात आले. हे संशोधन आणि एक्सरसाइज सेशनमध्ये वॉकिंग आणि सायकलिंगचाही समावेश करण्यात आला होता.
सेशन पूर्ण झाल्यानंतर संशोधनामध्ये सहभागी करण्यात आलेल्या लोकांचं ब्रेन फंक्शन मेजरमेंट करण्यात आलं. इन्सुलिन नोजल स्प्रेचा उपयोग केल्यानंतर समोर आलं की, सर्व लोकांमध्ये मेंदूची क्रियाशीलतेमध्ये सुधारणा झाली होती. दरम्यान, एक्सरसाइजमुळे वेट लॉस जरी कमी झालं असंलं तरीही मेंदूच्या आरोग्यामध्ये कमालीची सुधारणा दिसून आली. खास गोष्ट म्हणजे, मेटाबॉलिजम सामान्य स्वरूपात काम करत होत्या, त्यासाठी मेंदूचं व्यवस्थित काम करणं आवश्यक आहे. फक्त 8 आठवड्यांच्या एक्सरसाइजनंतर संशोधनामध्ये सहभागी लोकांची स्मरणशक्ती आणि ब्रेन फंक्शनशी संबंधित भागांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत दिसून आला.
संशोधनातून सिद्ध झालेल्या अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट हीदेखील होती की, फक्त 8 आठवड्यांच्या व्यायामानंतर लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त असणाऱ्या लोकांमध्ये ब्रेन फंक्शन आणि रिस्पॉन्स, सामान्य लोकांप्रमाणेच होता. पण तेच संशोधनाआधी करण्यात आलेल्या टेस्टमध्ये फार फरक होता.
(टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनामधून सिद्ध झाल्या आहेत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणाताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं.)