सध्या वेगवेगळ्या कारणांनी वजन वाढण्याच्या समस्येने जगभरातील लोक हैराण झाले आहेत. जाडेपणा हा केवळ विकसित देशाची समस्या राहिलेली नाही. विकसनशील देशांमध्येही राहणाऱ्या लोकांनाही जाडेपणाने जाळ्यात घेतले आहे. वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे आतापर्यंत समोर आली आहेत. पण नुकत्याच अमेरिकेत करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये अभ्यासकांनी वजन वाढण्याचं कारण ठरणाऱ्या जीन्सचा शोध लावला आहे.
जीन्स ठरवतात कोण जाड होणार
वेगवेगळ्या प्राण्यांवर करण्यात आलेल्या प्रयोगांनंतर अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलीना यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी एका अशा जीन्सचा शोध लावला ज्यामुळे मनुष्याच्या शरीराचा आकार, आकृती, उंची आणि जाडेपणा प्रभावित होतो. या रिसर्चमधून समोर आलेल्या निष्कर्षावरून जीन्स कशाप्रकारे हे आधीच ठरवतात की, एखादी व्यक्ती जाड व्हावी.
जर्नल नेचर जेनेटिक्समध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये अभ्यासकांनी क्रोमोसोमवर २४ कोडिंग जीन्सचा शोध लावला. यातील १५ सामान्य होते, तर ९ दुर्मिळ होते. हे कंबरेचा आकार कसा असेल हे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्या लोकांच्या कंबरेचा आकार मोठा असतो, त्यांना जाडेपणाशी संबंधित आजार होण्याचा धोका अधिक असतो.
टाइप २ डायबिटीसवर उपचार शोधण्यास मदत होईल
रिसर्चमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे कॅरी इ नॉर्थ यांनी सांगितलं की, 'पहिल्यांदाच आम्हाला हे जाणून घेण्याची संधी मिळाली की, कशाप्रकारे जीन्स शरीरात फॅटला प्रभावित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. हे समजून घेतल्यानंतर आम्ही जाडेपणा आणि त्याच्याशी संबंधित आजारांवर प्रभावी उपचार शोधण्यास यशस्वी होऊ. खासकरून टाइप २ डायबिटीस आणि हृदयाशी संबंधित आजारांवर.
रिसर्चमध्ये असे जेनेटिक पाथवेज आणि जीन्स सेटबाबत माहिती मिळाली जे केवळ जीवांमध्ये मेटाबॉलिज्म प्रभावित करतात असे नाही तर शरीरात फॅट टिशूचे वितरण बोन ग्रोथ आणि एडिपोनेक्टिन नावाचे हार्मोन नियंत्रित करतात. हे हार्मोन ग्लूकोजच्या स्तराला कंट्रोल करतात आणि फॅट पुढे सरकवतो. दुसऱ्या जीवांवर करण्यात आलेल्या प्रयोगाद्वारे या टीमला दोन अशा जीन्सची माहिती मिळाली जे शरीरात ट्रायग्लिसराइड आणि बॉडी फॅटमध्ये उल्लेखनीय वृद्धीशी संबंधित आहे.