Obesity In India Due To British Rule: भारतात मोठ्या प्रमाणात लोक लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. ज्यामुळे डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट डिजीजचा धोका वाढतो. बरेच लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते जिम आणि डाएट फॉलो करतात. तशी तर लठ्ठपणासाठी चुकीची लाइफस्टाईल, चुकीचं खाणं-पिणं ही मुख्य कारणं मानली जातात. पण आता आणखी एक कारण समोर आलं आहे जे हैराण करणारं आहे.
लठ्ठपणाचं कारण आहे 200 वर्षाची गुलामी
एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, भारतात लठ्ठपणासाठी सगळ्यात जास्त जबाबदार साधारण 200 वर्ष चाललेलं ब्रिटिश शासन आहे. इंग्रजांनी 1757 ते 1947 पर्यंत देशावर राज्य केलं. यादरम्यान देशात अनेकदा दुष्काळ पडला आणि पूरही आले. इतिहासकारांनुसार, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नीतिमुळे भारत-पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये एकूण 25 मोठे दुष्काळ पडले ज्यात 6 कोटींपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला.
एपिजेनेटिक्समधून धक्कादायक बाबींचा खुलासा
एपिजेनेटिक्स अशी स्टडी आहे ज्यात आपलं बिहेविअर आणि पर्यावरणाचा आपल्या डीएनएवर पडणाऱ्या प्रभावाची माहिती मिळते. एपिजेनेटिक्सच्या सायंटिस्टनुसार, 200 वर्षात अनेकदा दुष्काळ पडल्याने दक्षिण आशियातील लोकांच्या डीएनएमध्ये बरेच बदल झाले. याकारणाने अनेक पीढ्यांदरम्यान भारतीयांचं शरीर भूकेच्या अनुकूल झालं. याच कारणाने लठ्ठपणा, डायबिटीस, हाड ब्लड प्रेशर आणि हार्ट डिजीजचा धोका वाढला.
अमेरिकेच्या मर्सी हेल्थ-स्प्रिंगफील्ज रीजनल मेडिकल सेंटरचे एमडी डॉ. मुबीन सैय्यद यांनी आपला रिसर्च "The Susceptibility of South Asians to Cardiometabolic Disease as a Result of Starvation Adaptation Exacerbated During the Colonial Famines"मध्ये सांगितलं की, दुष्काळात जिवंत राहिलेल्या लोकांच्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये डायबिटीस आणि हाइपरग्लेसेमियाचा धोका दुप्पट वाढतो.
इंसुलिन सेंसिटिव्हिटी वाढली
डॉ. मुबीन सैय्यद यांच्यानुसार, एशिअन लोकांची बॉडी इन्सुलिन रेसिस्टेंट झाली आहे. यामुळे मसल्स, फॅट आणि लिव्हर सेल्स रक्तातील ग्लूकोजचं एब्जॉर्ब्शन करू शकत नाही आणि एनर्जीसाठी याचा वापर होऊ शकत नाही. ही मेडिकल कंडिशन डायबिटीस आणि लठ्ठपणाचं मोठं कारण ठरते.