(Image Credit : health enews)
हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या आजारांना काही वर्षांपूर्वी वाढत्या वयाशी संबंधित आजार मानले जात होते. पण आता हे आजार ३० ते ४० वयोगटातील लोकांमध्येही वेगाने वाढत आहेत. यासाठी आपली चुकीची लाइफस्टाइल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि इनअॅक्टिव लाइफस्टाइल जबाबदार आहे. अशात तुम्ही जर विचार करत असाल तर तुम्ही आजारांच्या जाळ्यात येऊ नये, तर यासाठी तुम्ही तुमच्या आहारात एका गोष्टीचा समावेश करणे गरजेचे आहे. याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होऊ शकतो.
ऑलिव्ह ऑइलच्या सेवनाने होईल मदत
एनबीटीने दिलेल्या वृत्तानुसार, हार्ट अटॅकचा धोका कमी करणाऱ्या गोष्टीचा आम्ही उल्लेख करत होतो ती गोष्ट म्हणजे ऑलिव्ह ऑइल. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, आपल्या रक्तात एक प्रकारचं प्रोटीन असतं, जे ऑलिव्ह ऑइलसारखे अनसॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ खाल्ल्याने वाढू लागतं. आणि हे सिद्ध झाल्याचं सांगितलं जात आहे की, ऑलिव्ह ऑइलचं नियमित सेवन केल्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या समस्यांचा धोका कमी होऊ लागतो.
रक्तातील प्रोटीन वाढवतं ऑलिव्ह ऑइल
आपल्या रक्तात एकप्रकारचं प्लाज्मा असतं, ज्याला अपोलिपोप्रोटीन ApoA-IV असंही म्हटलं जातं. आणि जेव्हा आपण ऑलिव्ह ऑइलचं सेवन करतो तेव्हा त्यातील अनसॅच्युरेटेड फॅट ApoA-IV ची लेव्हल वाढवतं. ज्यामुळे हृदयासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा धोका कमी होतो. जेव्हा आपण ऑलिव्ह ऑइलमध्ये तयार केलेले पदार्थ खातो तेव्हा रक्तातील प्लेटलेट्स उत्तेजित होतात आणि ते पांढऱ्या रक्तपेशींसोबत मिळतात. या एकत्रीकरणामुळे प्लेटलेट्स हायपरअॅक्टिविटी कमी होते आणि याने हार्ट अटॅक व स्ट्रोकचा धोका कमी होतो.
ऑलिव्ह ऑइलसोबत झोपही महत्त्वाची
ऑलिव्ह ऑइलमध्ये तयार केलेले पदार्थ खाल्ल्यावर झोप घेणेही फार गरजेचे आहे. कारण रिसर्च हे सांगतो की, ApoA-IV रात्रीच्यावेळी आपण झोपल्यावर जास्त अॅक्टिव राहतं आणि हृदयासंबंधी समस्यांना कंट्रोल करण्यास मदत करतं. पण सकाळी उठल्यावर ApoA-IV प्रोटीनचा स्तर कमी होतो.
शरीराला आराम आणि पोषक तत्त्वांची गरज
सेंट मायकल्स हॉस्पिटल कीनन रिसर्च सेंटर फॉर बायोमेडिकल सायन्समध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर येतं की, आपण आपल्या शरीराच्या बॉडी क्लॉकला समजून घेऊन शरीराला योग्य प्रकारे आराम दिला पाहिजे. सोबतच शरीराला पोषक तत्त्वांचीही गरज असते. जेणेकरून आपण फिट राहू.
टिप : वरील कोणत्याही गोष्टीचा आम्ही दावा करत नाही. केवळ ही माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाला हे मानवेलच असं नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)