OMG : अॅसिड हल्ल्यानेही खचली नाही ही तरुणी, वाचा सविस्तर !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2017 12:08 PM
खूपच कमी लोक आहेत जे या घटनेपासून स्वत:ला सावरुन पुन्हा नव्या उभारीने आयुष्य जगण्याची हिंमत दाखवितात.
सध्या जगभरात अॅसिड हल्ला सारख्या अत्यंत भयानक गोष्टी थांबतच नाहीत. हा विषय गंभीर असून यासारख्या आळा बसण्यासाठी अनेक चित्रपटांमध्येही प्रकाशझोतही टाकण्यात आला आहे. कधी एकतर्फी प्रेमासाठी तर कधी बदल्याची भावनाद्वारे अशा घटना घडत असतात. अॅसिड हल्ला झालेले लोक मानसिक आणि भावनिकदृष्ट्या पूर्णत: खचून जातात. खूपच कमी लोक आहेत जे या घटनेपासून स्वत:ला सावरुन पुन्हा नव्या उभारीने आयुष्य जगण्याची हिंमत दाखवितात. अशीच घटना २१ वर्षीय रेशम खान नावाच्या मुलीसोबत घडली आहे, जी या घटनेमुळे थोडीदेखील खचली नाही आणि पूर्ण हिमतीने पुन्हा नवीन आयुष्य जोमाने जगत आहे. विशेष म्हणजे तिच्या प्रयत्नाने आणि सकारात्मक विचाराने शरीरावर पडलेले डाग मिटले आणि ती पुर्वरत सुंदर दिसू लागली. रेशम खान सोबत ही घटना तेव्हा घडली जेव्हा ती जून महिन्यात लंडनमध्ये गाडी चालवत होती, तेव्हा कोणीतरी अचानक तिच्यावर अॅसिड फेकले. तिला हे देखील माहित नव्हते की, तिची चुक काय होती. पोलिसांनी या प्रकरणी २४ वर्षीय जॉन टॉम्लिन यांना दोषी ठरविले आहे. रेशन खान या घटनेने स्वत: खचली तर नाही पण अशाच प्रकारे अॅसिड हल्ला झालेल्या लोकांना हिंमत देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यात ती आपले स्वत:चे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते ज्यामुळे लोकांना खूपच प्रेरणा मिळते. विशेष म्हणजे लोकांचेही तिला भरपूर प्रेम आणि समर्थन मिळाले आहे.