नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने रुग्णालयांमध्ये वाढत आहे. दररोज शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉनचे सब व्हेरिएंट bf.7 हे चीनमधील वाढत्या प्रकरणांचे कारण असल्याचे म्हटले जात आहे. या व्हेरिएंटचा संसर्ग दर खूप जास्त आहे. डॉक्टरांच्या मते, हा सब व्हेरिएंटओमायक्रॉनचा सर्वात धोकादायक व्हेरिएंट आहे. हा व्हेरिएंट लसीद्वारे तयार झालेल्या इम्युनिटीला देखील बायपास करतो. भारतातही कोरोनाच्या bf.7 व्हेरिएंटची 4 प्रकरणे समोर आली आहेत.
ओमायक्रॉन bf.7 व्हेरिएंटमध्ये पुन्हा संसर्ग (रिइन्फेक्शन) होण्याचा धोका देखील आहे. या व्हेरिएंटची आर व्हॅल्यू म्हणजेच रिप्रोडक्शन संख्या 18 आहे. याचा अर्थ या व्हेरिएंटच्या संक्रमित रुग्णाच्या संपर्कात येऊन 18 लोकांमध्ये कोरोना पसरू शकतो. यामुळेच चीनमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. दररोज येथील प्रकरणे दुप्पट वेगाने वाढत आहेत. मात्र, हे गरजेचे नाही की व्हेरिएंटची आर व्हॅल्यू नेहमी सारखेच असली पाहिजे. ज्या भागात हा व्हेरिएंट पसरत आहे, त्या भागात त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात, यावर ते अवलंबून आहे.
या संदर्भात डॉ. अजय कुमार यांनी सांगितले की, कोरोनाच्या इतर व्हेरिएंटची आर व्हॅल्यू 5 पेक्षा कमी आहे. आतापर्यंत भारतात आलेल्या सर्वात धोकादायक व्हेरिएंट डेल्टाची आर व्हॅल्यू सुरुवातीला 1 होती, नंतर ती 2 पर्यंत वाढली होती, म्हणजे डेल्टाचा संसर्ग झाल्यास 3 लोकांमध्ये हा व्हायरस पसरू शकतो. कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान, डेल्टाचे आर व्हॅल्यू 3 होते, परंतु ते यापेक्षा जास्त झाले नाही. जेव्हा व्हायरसचा प्रभाव कमी होऊ लागला तेव्हा आर व्हॅल्यू कमी होऊन 1 पेक्षा कमी झाली. याशिवाय, अल्फा आणि लॅम्बडा व्हेरिएंटची आर व्हॅल्यू कधीही एकापेक्षा जास्त झाली नाही. हे व्हेरिएंट काही महिन्यांतच कमकुवत झाले होते.
ओमायक्रॉनच्या इतर व्हेरिएंटचे आर व्हॅल्यू पाच पेक्षा जास्त नाही दरम्यान, ओमायक्रॉनचे bf.7 व्हेरिएंट सोडून कोणत्याही व्हेरिएंटचे आर व्हॅल्यू पाच पेक्षा जास्त नाही आहे. ओमायक्रॉन bf.7 वेगाने पसरत आहे, कारण त्याचा रिप्रोडक्शन नंबर अधिक आहे, परंतु हे गरजेच नाही की, या व्हेरिएंटचा एक संक्रमित 18 लोकांमध्ये व्हायरस प्रसारित करेल. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या प्रतिकारशक्तीवर आणि त्यांना आधी नैसर्गिक संसर्ग झाला होता की नाही यावरही हे अवलंबून असते.