शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

"ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग किती आहे, हे येत्या दोन आठवड्यांत कळेल"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 10:04 PM

Omicron spread Speed India: आज महाराष्टात 7 नवे रुग्ण आढळले. यामधील एक मुंबईतील धारावी झोपडपट्टीत परिसरातील आहे.

नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत (Omicron COVID-19 Variant)अतिरिक्त खबरदारी घेतली जात आहे. आतापर्यंत भारतात या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंची लागण झालेले एकूण 32  रुग्ण आहेत. आज महाराष्टात 7 नवे रुग्ण आढळले. यामधील एक मुंबईतील धारावी झोपडपट्टीत परिसरातील आहे. शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या स्थितीबद्दल पत्रकार परिषद घेतली.

यातच आता ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, ओमायक्रॉन किती धोकादायक आहे, किती वेगाने पसरतो? येत्या दोन आठवड्यांत याबाबत संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होईल. दरम्यान, ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत सतत बातम्या येत आहेत की, हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा कमी धोकादायक आहे. पण, हा डेल्टा पेक्षा खूप वेगाने पसरतो.

शनिवारी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सचिवांची बैठक (Cabinet secretary Meeting on Omicron) देखील होणार आहे. या बैठकीत देशातील कोरोना विषाणूची ताजी परिस्थिती, आरोग्य सुविधा यावरही विचारमंथन केले जाणार आहे. दरम्यान, देशात अनेक ठिकाणांहून बनावट लसीकरणाची प्रकरणेही समोर आली आहेत. यावर सूत्रांनी सांगितले की, या डेटा एंट्री स्तरावर झालेल्या चुका आहेत. अशी मोजकीच प्रकरणे आहेत. अशा परिस्थितीत, अशी प्रकरणे भारताच्या लसीकरण कार्यक्रमाचे मोठे चित्र मांडत नाहीत.

मुंबईत ओमायक्रॉनचे तीन नवीन रुग्णमागील आठवड्यात परदेशातून आलेल्या तीन प्रवाशांना ओमायक्रॉनची लागण झाली असल्याचे शुक्रवारी उजेडात आले आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. या रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत, तरीही खबरदारी म्हणून त्यांना मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी एक रुग्ण गुजरात येथील रहिवाशी आहे, तर दुसरा धारावीमध्ये वास्तव्यास आहे. दरम्यान, मुंबईतील ओमायक्रॉनच्या पहिल्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

59 देशांत ओमायक्रॉनचा प्रादुर्भावआरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन 53 देशांमध्ये पसरला आहे. 2936 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यूकेमध्ये 817, डेन्मार्कमध्ये 796 आणि दक्षिण आफ्रिकेत 431 मध्ये सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. यानंतर कॅनडामध्ये 78, अमेरिकेत 71, जर्मनीमध्ये 65, दक्षिण कोरियामध्ये 60 जणांना ओमायक्रॉनची लागण झ्लायेच दिसून आले आहेत. तर ऑस्ट्रेलियामध्ये 52, झिम्बाब्वेमध्ये 50, फ्रान्समध्ये 42, पोर्तुगालमध्ये 37, नेदरलँडमध्ये 36, नॉर्वेमध्ये 33, घानामध्ये 33 आणि बेल्जियममध्ये 30 रुग्ण आढळले आहेत.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत