भारतात कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron Variant) केसेस सतत वाढतच आहेत. याच्या लक्षणांबाबत चिंताही वाढत आहे. घशात खवखव, खोकला-सर्दी नसताना घशात खवखव, नाक वाहणं किंवा नाक बंद होणं यासारखी लक्षणं ओमायक्रॉनची सुरूवातीची लक्षणं आहेत. यातील एक लक्षण दिसलं तरी अनेक लोक विचार करत आहेत की, त्यांना ओमायक्रॉनचं संक्रमण होऊ शकतं आणि त्यामुळे त्यांनी टेस्ट करायला हवी. पण केवळ एक लक्षण दिसल्याने हे समजणं की, तुम्हाला ओमायक्रॉनचं संक्रमण आहे, तज्ज्ञांनुसार हे चुकीचं आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, भायखळा मुंबईच्या मासीना हॉस्पिटलचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशिअन, एमडी चेस्ट अॅन्ड ट्यूबरकुलोसिस, डॉ. सुलेमान लधानी सांगतात की, 'आम्हाला आढळलं की, घशात खवखव होणं ओमायक्रॉनच्या लक्षणांपैकी एक आहे. पण केवळ घशात खवखव असणं याचा अर्थ हा नाही की, तुम्ही ओमायक्रॉनने संक्रमित आहात'.
ते पुढे म्हणाले की, 'पण, जर तुम्ही त्या लोकांच्या संपर्कात आले असाल जे प्रवास करून आले आहेत किंवा जर तुम्हाला घशात खवखव सोबतच नाक वाहणं, ताप किंवा अंगदुखी असेल तर तुम्ही कोविडची टेस्ट नक्की करावी. केवळ घशात खवखव असणं म्हणजे तुम्हाला ओमायक्रॉनची लागण झाली असं होत नाही. हे केवळ वातावरणामुळेही होऊ शकतं. याला घाबरण्याची गरज नाही'.
WHO चे दक्षिण-पूर्व आशिया भागातील निर्देशक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी ओमायक्रॉनबाबत सांगितलं की, आतापर्यंत आम्हाला जे माहीत आहे, ओमायक्रॉन डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत वेगाने पसरतो. यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये याच्या रूग्णांची वाढ होत आहे.
पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार, दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, ज्या लोकांची काहीच ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. ते सुद्धा ओमायक्रॉनने संक्रमित होत आहेत. याचा अर्थ असा होतो की, ओमायक्रॉन हळूहळू कम्युनिटी स्प्रेड होत आहे. हेही म्हटलं जाऊ शकतं की, ज्या लोकांना कोविड वॅक्सीनचे दोन डोज घेतले आहेत, त्यांना हलक्या स्वरूपाचं संक्रमण होत आहे.
हैद्राबादच्या यशोदा हॉस्पिटलचे कन्सल्टंट इंटरवेंशनल पल्मोनोलॉजिस्ट डॉ. गोपी कृष्ण येदलपती म्हणाले की, 'ओमायक्रॉनच्या संबंधित संक्रमण फार हलकं असतं. यात घशाची समस्या, भूक न लागणे आणि जरा कमजोरी वाटणे यांचा समावेश आहे'.
ते पुढे म्हणाले की, 'राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आकडेवारीनुसार, ओमायक्रॉनच्या जास्तीत जास्त केसेसमध्ये खोकला, सर्दी, धाप लागणे, गंध आणि चव कमी असे पारंपारिक लक्षणं बघितले गेले नाहीत. अशात जर तुमची काही ट्रॅव्हल हिस्ट्री नसेल किंवा तुम्ही अशा व्यक्तीच्या संपर्कात आले नाहीत जे प्रवास करून आले आहेत किंवा तुम्हाला घशात खवखव वा अंगदुखी सारखे सामान्य लक्षण असेल तर तुम्ही अनावश्यक टेस्ट टाळली पाहिजे'.