कोविड-१९ चा (Covid 19) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या (Omicron Variant) केसेस देशात वेगाने वाढत आहेत. ओमायक्रॉनचा प्रसार बघता, त्याला डेल्टापेक्षा घातक मानला जात आहे. एक्सपर्ट म्हणाले की, ओमायक्रॉनमध्ये डेल्टाच्या तुलनेत लक्षणं कमी दिसतात. पण हा फार वेगाने पसरतो. रिसर्चमधून समोर आलं की, इतर व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉन हलका आहे. तेच ब्रिटनच्या पहिल्या अधिकृत रिपोर्टनुसार, या व्हेरिएंटने हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा धोका डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ५० ते ७० टक्के कमी आहे.
तज्ज्ञांनुसार, ओमायक्रॉनचं लक्षण (Omicron Symptoms) भलेही हलके असो पण याला सर्दी-खोकल्यासारखं हलक्यात घेऊ नका. उलट याची लक्षणं दिसतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा. थकवा, सांधेदुखी, सर्दी, डोकेदुखी हे ओमायक्रॉनची ४ सुरूवातीची लक्षणं आहेत. इतर काही रिसर्चनुसार, नाक सतत वाहणं, शिंका येणं, घशात खवखव किंवा रूतल्यासारखं वाटणं, भूक न लागणं, कोरडा खोकलाही ओमायक्रॉनच्या लक्षणांच्या श्रेणीत येतात. नुकतेच ओमायक्रॉनच्या काही लक्षणांबाबत सांगण्यात आलं आहे जे त्वचेवर दिसतात.
त्वचेवर दिसणारं ओमायक्रॉनचं लक्षण
जसजशा ओमायक्रॉनच्या केसेस समोर येत आहेत तसतसे वेगवेगळेही लक्षणं समोर येत आहेत. ओमायक्रॉनच्या काही रूग्णांना थंडी भरून येण्यासारखंही लक्षण दिसल तर काहींमध्ये त्वचेसंबंधी समस्या दिसली. कोविड १९ च्या रूग्णांद्वारे सांगण्यात आलेल्या लक्षणांचं विश्लेषण करणारं अॅप ZOE Covid वर रूग्णांनी सांगितलं की, त्यांच्या त्वचेवर रॅशेज दिसत आहेत. विश्लेषण केल्यावर समोर आलं की, रूग्णांनी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीन समस्या होत असण्याबाबत सांगण्यात आलं आहे.
हीव्स
काही लोकांना त्वचेवर लाल चट्टे दिसत आहेत. इतकंच नाही तर त्यावर त्यांना खाजही येत आहेत. ही खाज किंवा निशाण सामान्यपणे काही मिनिटांपर्यंत राहते. जर तुम्हाला हे लक्षण दिसत असेल तर कोविड टेस्ट करून घ्या.
टोकदार पुरळ
याला हीट रॅशेज असंही म्हणतात. यात शरीरावर टोकदार पुरळ येते. ही हळूहळू संपूर्ण शरीरावर पसरते. यात काहीवेळा सूजही येते. हे शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतं. लंडनच्या एक्सपर्टने सांगितलं की, ओमायक्रॉनची लागण झालेल्या लहान मुलांमध्ये चट्टे बघण्यात आले आहेत.