नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून आपण ओमायक्रॉनच्या भीतीखाली जगत आहोत. ओमायक्रॉनचा वेगाने प्रसार होत असला तरी तो उग्र किंवा घातक नाही, ही सर्वांत चांगली बाब आहे. ओमायक्रॉनमुळे जगात तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. त्या सर्वांचे लसीकरण झालेले नव्हते. यावर प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे.
ओमायक्रॉन हा स्वत: कमी घातक आहे का? अतिरिक्त डोससह लसीकरणयुक्त गंभीर आजार असलेले लोक यापासून सुरक्षित आहेत का? याचे प्रत्येकाला उत्तर हवे आहे. प्रत्येकाला माहिती आहे की, नोव्हल ओमायक्रॉन व्हेरिएंट हा मूळ सार्स-सीओव्ही-२ आणि डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जास्त वेगाने पसरतो. एकदा संक्रमण झाल्यानंतर २४ तासांत मूळ सार्स-सीओव्ही-२ आणि डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉनची ७० वेळा अधिक वेगाने पुनरुत्पत्ती होते.
त्याच्या विपरीत तो ओमायक्रॉन कमी प्रभावीपणे (१० वेळापेक्षा कमी) मानवी फुफ्फुसाच्या उतींमध्ये पुनरुत्पत्तीत होतो. त्यामुळे रोगाच्या कमी गंभीरतेचे संकेत देतो. उत्परिवर्तनांमुळे तो प्रतिकारशक्तीला जुमानत नाही. त्यामुळे मोनोक्लोनल अँटिबॉडीज काम करीत नाहीत. याला अपवाद आहे तो जीएसकेने विकसित केलेल्या सोट्रोविमॅबचा आहे.
अलीकडच्या संशोधनाच्या निष्कर्षावर एक नजर इम्पेरियल कॉलेज लंडनमधील संशोधकांचे म्हणणे आहे की, ओमायक्रॉनमध्ये डेल्टाच्या तुलनेत गंभीरतेच्या बाबतीत कमी बदल झाले. वय, आरोग्य स्थिती, पूर्वीचे संक्रमण व लसीकरणाची स्थिती नियंत्रण केल्यास ओमायक्रॉन डेल्टाच्या तुलनेत ११ टक्के कमी गंभीर आजार निर्माण करू शकतो.ओमायक्रॉनबाबत सीडी४टी पेशींमध्ये सातत्याने घट होते. परंतु ७० टक्के प्रतिक्रिया संरक्षित आहे.डिस्कव्हरी हेल्थ या दक्षिण आफ्रिकेच्या सर्वांत मोठ्या खासगी आरोग्य विमा प्रशासकांनी केलेल्या विश्लेषणानुसार, फायझर लसीचे दोन डोस ओमायक्रॉनपासून रुग्णालयात भरती होण्यापासून रोखण्यात ७० टक्के प्रभावी आहे. तसेच ओमायक्रॉनचे संक्रमण रोखण्यास ३३ टक्के प्रभावी आहे.ब्रिटनमधील आरोग्य सुरक्षा संस्थेच्या नुकत्याच आलेल्या अहवालात म्हटले आहे की, बुस्टर डोसमुळे ७० ते ७५ टक्के लक्षणात्मक आजारांपासून संरक्षण मिळण्याची शक्यता वाढते.
अंतिम निष्कर्ष ओमायक्रॉन सध्याही उच्च संक्रामक आहे. अमेरिकेत त्याचे रुग्ण दोन किंवा तीन दिवसांत दुप्पट होत आहेत. रुग्णालयात दाखल केल्यानंतरही तो जेवढा वाढायचा तेवढाच वाढतो.-त्याच्यापेक्षा त्याचा व्हेरिएंट हलका असला तरी सर्वसामान्य सर्दी म्हणून ओमायक्रॉनकडे पाहणे घाईचे ठरेल. लोकसंख्या आणि गर्दीची ठिकाणे नियंत्रणाबाहेर असलेल्या भारतासारख्या देशात १००पैकी एका रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडत असली तरी अंतिम संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे.