भारतात करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेला कहर आपल्या सर्वांनाच आजही आठवत असेल. करोनाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने जीव गमावणाऱ्यांचा आकडाही उच्चांकावर पोहोचला आहे. या काळात लोकांकडे नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. आता कोविडचा नवीन प्रकार Omicron भारतात दाखल झाला आहे, WHO ने लोकांना इशाऱ्यांसोबतच काही सूचनाही दिल्या आहेत. जगभरात ओमायक्रॉनच्या वाढत्या केसेसमुळे येणारे सणवारांवर थोडे विरजन पडू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. जर तुम्ही बेफिकीरपणे लग्न-पार्टी फंक्शन्सचा आनंद घेत असाल तर थोडं सावध राहा. सर्व प्रतिबंधात्मक उपाय करत राहा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना संपूर्ण लसीकरण करून घेण्याचा सल्ला द्या.
डब्ल्यूएचओचे (WHO) प्रमुख डॉक्टर टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस म्हणाले की - दक्षिण आफ्रिकेतील उदयोन्मुख डेटा सूचित करतो की ओमायक्रॉनमुळे पुन्हा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. आता कोणत्याही प्रकारच्या लग्न-समारंभात हजेरी लावणे लोकांना भारी पडू शकते, असा इशाराचा त्यांनी दिला आहे. यामध्ये लोकांचा जीव जाऊ शकतो. यासोबत डब्ल्यूएचओचे आपत्कालीन संचालक मायकेल रायन म्हणाले की, सध्याच्या डेटावरून असे दिसून येते की ओमायक्रॉन प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा अधिक कार्यक्षमतेने प्रसारित होत आहे.या लोकांना रिइन्फेक्शनचा धोका अधिक
हे चिंताजनक विधान अशा वेळी आले आहे जेव्हा प्रत्येकजण सेलिब्रेशन मूडमध्ये आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्ष जवळ आल्याने लोकांनी करोनाची लागण होण्याची चिंता जवळजवळ सोडूनच दिली आहे. पण करोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराने पुन्हा संसर्ग वाढू शकतो या विधानानंतर, विशेषत: ज्यांना यापूर्वी करोनाची लागण झाली होती आणि त्यातून जे बरेही झाले आहेत, त्यांची भीती पुन्हा वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेतील एका अभ्यासाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये कोविड-19 च्या २ कोटी ७ लाख ९६ हजार ९८२ प्रकरणांची पुष्टी झाली आहे. ही सर्व प्रकरणे २७ नोव्हेंबरच्या ९० दिवस आधीची आहेत. ते म्हणाले की, ज्या व्यक्तींची पहिली टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ९० दिवसांनी पुन्हा एकदा तो परत पॉझिटिव्ह आढळला असेल तर त्याला पुन्हा ओमिक्रॉनचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे.
सध्यातरी वॅक्सिन आहे ढालजर तुम्हाला याआधी कोविड झाला असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत लस घेणे महत्त्वाचे आहे. तज्ञांनी सल्ला दिला आहे की करोना झालेल्या ज्या रूग्णांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे त्यांनी बरे झाल्यानंतर कमीतकमी तीन महिन्या नंतर वॅक्सिन घ्यावे व ३ महिन्यांचा काळ रिकव्हर होण्यास द्यावा. ही दिलासा देणारी बाब आहे की लसीकरण न झालेल्या लोकांच्या तुलनेत वॅक्सिन घेतलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता कमी आहे.
लग्न व पार्टीमध्येही करा ही गोष्टसण आणि सुट्ट्यांचा आनंद लुटण्याचा अर्थ असा नाही की आपण त्याबद्दल बेजबाबदार आणि निष्काळजी व्हावे. विशेषत: जेव्हा कोविड-19 चा प्रश्न येतो तेव्हा आपण अधिक सतर्क राहून सर्व प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे. लग्न-समारंभाच्या वातावरणातही मास्क घालणे हा सर्वोत्तम आणि सुरक्षित मार्ग आहे. असे केल्याने तुम्ही केवळ करोनापासूनच स्वतःचे संरक्षण करू शकत नाही तर तुम्ही हा संसर्ग इतर व्यक्तींमध्ये पसरण्यापासूनही रोखू शकता. मग भलेही तुमचे लसीकरण झाले आहे की नाही याची पर्वा न करता मास्क घालणे सुरू ठेवा. जेव्हा तुम्ही गर्दीच्या ठिकाणी असता तेव्हा हे खूप महत्वाचे आहे.
ओमायक्रॉनचा धोका असताना घरगुती पार्टीत किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सध्या भेटीगाठी किंवा जास्त गर्दी करणं चांगलं नाही. सोशल डिस्टंसिंग ठेवा आणि कुठेही बाहेर जाणे टाळा. तुम्ही बाहेर जात असलात तरी स्वच्छता राखणे, मास्क घालणे आणि लोकांपासून अंतर राखणे अत्यंत आवश्यक आहे.
हे पदार्थ खाऊन वाढवा इम्युनिटीउत्तम आरोग्यासाठी सकस आणि पौष्टिक पदार्थ खाल्ले पाहिजेत. फायबर, जीवनसत्त्वे, खनिजांनी समृध्द असलेले अन्नपदार्थ केवळ तुमचे पोटच निरोगी ठेवत नाहीत तर रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतात. हिवाळ्यातही भरपूर पाणी प्या. हे तुम्हाला हायड्रेटेड ठेवेल आणि उर्जेने परिपूर्ण वाटेल. आशा आहे की तुम्ही WHO ने दिलेल्या चेतावणी वजा सूचनांचे पालन कराल आणि भारतात Omicron चा प्रसार रोखण्यासाठी तुमची जबाबदारी पार पाडाल.