कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) डेल्टा व्हेरिएंटनंतर आता भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Variant) थैमान घातलं आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, बुधवारी देशात ५८, ०९७ कोरोनाच्या केसेस समोर आल्या. यात ओमायक्रॉनची लागण झालेल्या केसेस २१३५ इतक्या आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संक्रमणाचा वेग खूप जास्त आह. त्यामुळे आता अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावले जात आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रकारची काळजीही घेतली जात आहे.
कोरोनाचे जेवढे व्हेरिएंट आतापर्यंत आले त्या प्रत्येकांचा व्यवहार वेगळा होता. प्रत्येक व्हेरिएंटमध्ये लक्षण आणि ती लक्षणं दिसण्याचा कालावधीही वेगळा होता. उदाहरणार्थ ओमायक्रॉनच्या संक्रमणात केवळ सामान्य लक्षणेच दिसत आहेत. ओमायक्रॉनने संक्रमित जास्त रूग्णांमध्ये श्वासासंबंधी समस्या दिसत नाहीये. पण ओमायक्रॉनची लक्षणं पहिल्यांदा कधी दिसतात? हे समोर आलं आहे.
अनेक एक्सपर्ट्सचं मत आहे की, ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या केसेसमध्ये संक्रमण होण्यापासून ते लक्षण दिसण्यापर्यंत वेळेत बदल झाला आहे. शिकागो डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ कमिश्नर डॉ. एलिसन अरवाडी म्हणाले की, 'आता एखाद्या व्यक्तीच्या कोविडच्या संपर्कात येण्याचा आणि त्यांना संक्रमण होण्यासाठी लागणारा वेळ कमी झाला आहे. लक्षणं दिसणं आणि संक्रमण पसरणं याच्यातही आधीच्या तुलनेत कमी वेळ लागत आहे. तेच लोकांना रिकव्हर व्हायलाही कमी वेळ लागत आहे. कारण अनेकांनी वॅक्सीन घेतली आहे'.
किती दिवसात दिसतात कोविडची लक्षणं?
अमेरिकेच्या सीडीसीच्या नव्या गाइडलाईननुसार, एखाद्या नॉर्मल व्यक्तीला व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर २ ते १४ दिवसांच्या आत COVID ची लक्षणं दिसू शकतात.
जर कुणातही लक्षणं दिसत असतील तर त्यांनी वेळीच टेस्ट करून घ्यावी. तेच काही लोकांमध्ये असंही होऊ शकतं की, त्यांच्यात लक्षणं दिसतच नसतील, पण तो व्हायरस पसरत आहे. एक्सपर्टनुसार, अनेकदा लक्षणं दिसण्याआधीच व्यक्तीपासून दुसऱ्यांना संक्रमण होणं सुरू होतं.
सीडीसीनुसार, गाइडलाईन अपडेट करण्यात आली होती. ज्यानुसार, व्यक्तीमध्ये लक्षणांची सुरूवात १ ते २ दिवसाआधी आणि लक्षणं दिसण्याच्या २ ते ३ दिवसांनंतर दुसऱ्यांमध्ये संक्रमण फसरण्याचा धोका सर्वात जास्त राहतो. डॉ. अऱवाडी म्हणाले की, सीडीसीच्या डेटामधून हे समजतं की, ७ दिवसांनंतर हा व्हायरस एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत पसरण्याचा धोका नसतो.
कधी करावी टेस्ट?
सीडीसीनुसार, जर कुणीही व्हायरसच्या संपर्कात आले, तर त्यांनी संपर्कात येण्याच्या ५ दिवसांनंतर किंवा जसंही कोणतं लक्षण दिसलं तर लगेच टेस्ट करून घ्यावी. जर कुणाला लक्षणं दिसत असतील तर त्यांनी लगेच क्वारंटाइन व्हायला पाहिजे.