भारतासह संपूर्ण जगाने कोरोना व्हायरसचा कहर पाहिला आहे. कोरोना व्हायरस हा काही वर्षांपूर्वीच आला होता, पण एक असा जीवघेणा आजार आहे जो शतकानुशतके लोकांना आपल्या जाळ्यात ओढत आहे. कॅन्सर या जीवघेण्या आजाराचा धोका झपाट्याने वाढत आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च (एनसीडीआयआर) आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांच्या एक धडकी भरवणारा अभ्यास समोर आला आहे. यानुसार भारतात प्रत्येक नऊपैकी एका व्यक्तीला कॅन्सर होण्याचा धोका असतो.
इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च (IJMR) मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, प्रत्येक 67 पुरुषांपैकी एकाला फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका असतो. त्याच वेळी, 29 पैकी एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो. 74 वर्षांच्या लोकांमध्ये कॅन्सरचा धोका दिसून आला आहे. अभ्यासानुसार, असा अंदाज आहे की 2022 मध्ये भारतात 14.6 लाख लोक कॅन्सरने ग्रस्त होते.
अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पुरुषांमध्ये लंग कॅन्सर आणि महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका सर्वाधिक असतो. याशिवाय 14 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये लिम्फॉइड ल्युकेमिया कॅन्सरचा धोका दिसून आला. मुलांमध्ये कॅन्सरचा धोका 29.2 टक्के आणि मुलींमध्ये 24.2 टक्के होता. 2020 च्या तुलनेत 2025 मध्ये कॅन्सरच्या रुग्णांमध्ये 12.8 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
संशोधकांचे म्हणणे आहे की कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने होणारी वाढ ही वाढती लोकसंख्या आणि बदलांमुळे होत आहे. भारतातील 60 वर्षांवरील वृद्धांची लोकसंख्या वाढण्याची अपेक्षा आहे, असे त्यांचे मत आहे. विशेषत: त्यांचे प्रमाण 2011 मध्ये 8.6% वरून 2022 मध्ये 9.7% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. हे जोखीम घटकांवर, सुधारणांवर, स्क्रीनिंग प्रोग्राम आणि कॅन्सर शोधण्यासाठी आणि उपचारांच्या तंत्रांवर अवलंबून असते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"