कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणात जगभरातील शास्त्रज्ञ लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक देशातून परिक्षणाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. क्लिनिकल ट्रायलची प्रक्रिया दीर्घकालीन असल्यामुळे लस तयार होण्यासाठी विलंब होण्याची शक्यता आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार १३ लसींचे सध्या क्लिनिकल ट्रायल सुरू आहे.
ब्रिटनच्या ऑक्सनफोर्ड युनिव्हर्सिटीची लस सगळयात पुढे आहे. भारतातील सीरम इंडीया इंस्टिट्यूट या लसीचे उत्पादन करणार आहे. प्राण्यांवर केलेल्या परिक्षणानंतर लसीचे सकारात्मक परिणाम येऊ शकतात. अशी आशा तज्ज्ञांना आहे. ब्रिटनमध्ये अजून एका कोरोना लसीचे माणसांवर परिक्षण करण्याची तयारी सुरू आहे. लंडनच्या इंपीरियल कॉलेजमध्ये ३०० लोकांवर लसीचे परिक्षण केले जाणार आहे.
प्रोफेसर रॉबिन शटोक हे या ट्रायलचे नेतृत्व करत आहेत. इंपीरियल कॉलेज लंडनमध्ये होत असलेल्या मानवी परिक्षणाआधी प्राण्यांवर या लसीचे ट्रायल यशस्वी झाले आहे. तज्ज्ञांचा दावा आहे की, या लसीमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होईल. या लसीचे मानवी परिक्षण यशस्वी झाल्यास ३०० रुपयांपेक्षा कमी किमतीत ही लस उपलब्ध करून दिली जाणार आहे.
इंपीरियल कॉलेज ऑफ लंडनच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ही लस माणसांसाठी किती सुरक्षित आहे. हे पाहिले जाणार आहे. प्रोफेसर रॉबिन शेटॉक यांनी सांगितले की, आम्ही कमी दरातील आणि सुरक्षित लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहोत. मानवी परिक्षणात सकारात्मक परिणाम दिसून आल्यास पुढील टप्प्यात ६ हजार लोकांवर परिक्षण केले जाणार आहे. ठरवल्याप्रमाणे लसीचे ट्रायल यशस्वी झाल्यास या वर्षाच्या शेवटापर्यंत लस उपलब्ध होऊ शकते.
प्रोफेसर शेटॉक यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार लस तयार करण्यासाठी त्यांना ब्रिटिश सरकरकडून जी किंमत मिळाली आहे. त्यातून २५ लाख डोस तयार होऊ शकतात. लसीचे ५० लाख डोस बनवण्यासाठी सांगण्यात आले आहे. सध्या जगभरात १२० पेक्षा जास्त जागांवर कोरोनाची लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. १३ ठिकाणी परिक्षण सुरू आहेत. या १३ पैकी चीन, अमेरिका, ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया, रुस आणि जर्मनीमध्ये ट्रायल सुरू आहे.
एक 'असा' धातू; ज्याच्या कोटिंगमुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसचा होतो खात्मा; जाणून घ्या धातूबाबत