भारताची राजधानी असलेल्या दिल्लीसहउत्तर प्रदेशमध्ये एका गंभीर आजाराने थैमान घातलं आहे. डिप्थीरिया असं या आजाराचं नाव असून आतापर्यंत या आजारामुळे 20 बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये या आजाराची लागण झालेल्या बालकांची संख्या 157 वर पोहोचली आहे. या आजारामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या लहान मुलांमध्ये सर्वात जास्त संख्या ही उत्तर प्रदेशमधील मुलांची आहे. त्याचप्रमाणे या आजारामुळे मृत्यू झालेल्या 20 मुलांपैकी 19 मुलंही उत्तर प्रदेशमधील आहेत. तर दिल्लीमधील 14 मुलांमध्ये डिप्थीरियाची लक्षणं आढळून आली आहेत.
अँटिडॉट सीरम घेतल्यानंतरही मृत्यू
रविवारी महर्षी वाल्मीकि हॉस्पिटलमध्ये डिप्थीरिया झालेल्या एका मुलाला अॅडमिट करण्यात आले. या आजाराच्या उपचारासाठी देण्यात येणारे अँटिडॉट सीरम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्यामुळे त्याचे पालकांचं टेन्शन कमी झालं होतं. परंतु सोमवारी या आजाराची लागण झालेल्या आणखी एका बालकाचा मृत्यू झाल्याने पुन्हा कुटुंबियांची चिंता वाढली. कारण या आजारातून बचावासाठी देण्यात येणारे अँटिडॉट सीरम दिल्यानंतरही या बालकाचा मृत्यू झाला होता.
दरवर्षी सप्टेंबरमध्ये थैमान घालतो डिप्थीरिया
डिप्थीरियाचे विषाणू दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये अॅक्टिव्ह होतात. या आजाराची लक्षणं आढळलेल्या 15 ते 20 टक्के रूग्णांचा मृत्यू होतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी या आजाराची लागण होऊन अनेक बालकांचा मृत्यू होतो. डिप्थीरिया एक प्रकारचा इन्फेक्शन पसरवणारा आजार आहे. याची लागण साधारणतः लहान मुलांना पटकन होत असून मोठ्या माणसांनाही हा आजार होऊ शकतो. हे विषाणू सर्वात आधी गळ्यामध्ये इन्फेक्शन पसरवतात. यामुळे श्वसननलिकेपर्यंत इन्फेक्शन पसरते. डिप्थीरिया हा संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे याची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आल्याने लवकर हा रोग पसरतो.
या आजाराची लक्षणं
- श्वास घेण्यास त्रास
- घश्यामध्ये सूज येणं
- थंडी वाजणं
- ताप
- घश्यात खवखव होणं आणि खोकला येणं
वॅक्सिनेशन गरजेचं
वॅक्सिनेशनमुळे लहान मुलांना डिप्थीरिया या आजारापासून वाचवणे सहज शक्य आहे. नियमित लसीकरणामध्ये डीपीटीची लस लहान मुलांना देण्यात येते. 1 वर्षांमध्ये मुलाला डीपीटीच्या 3 लसी देण्यात येतात. त्यानंतर दीड वर्षाचा झाल्यानंतर चौथी लस देण्यात येते आणि 4 वर्षांचा झाल्यानंतर पाचवी लस दिली जाते. सलीकरण वेळेवर घेतल्याने डिप्थीरियापासून बचाव होणं सहज शक्य होतं.