पोटाचे असंख्य विकार आहेत. त्याची कारणं पण अनेक आहेत. काहीजणांना जेवण नीट पचत नाही तर काही जणांना बद्धकोष्ठता असते. पोटाचे विकार अनेक असले तरी त्याचे उपायही अनेक आहेत. पोट फुगणे ही अशीच एक समस्या आहे. मात्र यावर अत्यंत साधे सोपे घरगुती उपाय आहेत.
शतपावली करणेजेवण झाल्यानंतर शतपावली करणं हा सोपा आणि फायदेशीर उपाय आहे. जेव्हा आपले जेवणं होते आणि त्यानंतर तुम्ही कोणतीही क्रिया करत नाही तेव्हा पोटात गॅस होतो आणि पोट फुगल्यासारखे वाटते. तसेच जेवणही नीट पचत नाही. हे देखील पोट फुगण्यासाठी कारण ठरू शकते. त्यामुळे जेवल्यानंतर चाला. तुम्ही घरीही चालू शकता. त्यामुळे तुम्ही खाल्लेले अन्न चांगले पचेल आणि पोट फुगणारही नाही.
गरम पाणी पिणेजेवल्यानंतर तुम्ही गरम पाणी प्या. यामुळे तुमचे पचन योग्यरितीने होईल आणि गॅसही होणार नाही. पण तुम्ही लक्षात घ्या गरम पाणीच प्या. थंड पाणी अजिबात पिऊ नका.
सावकाश जेवापोट न फुगण्यासाठी तुम्ही सावकाश जेवा. तोंडातला घास बत्तीस वेळा चावून खा. खाताना छोटे तुकडे होतात. त्यामुळे अन्न सहज पचते आणि गॅस होत नाही. परीणामी पोटही फुगत नाही.
च्युंगम खाऊ नकाच्युंगममध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे पोट फुगते. त्यामुळे च्युंगम खाऊ नका. तुम्ही त्याएवजी पेपरमिंटच्या गोळ्या किंवा बडिशेप खाऊ शकता. त्यामुळे तुमच्या तोंडाला वास येणार नाही. तोंड फ्रेश राहिल आणि पोटही फुगणार नाही.
योगासनेतुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर काही योगासने यावर फायदेशीर उपाय ठरू शकतात. बालासन, आनंद बालासन, स्क्वॅट अशी योगासने व व्यायामप्रकार केल्यास तुम्हाला पोट फुलण्याची क्षमता जाणवणार नाही.