खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अलिकडे अनेकांना किडनी स्टोनची समस्या होने सामान्य बाब झाली आहे. जेव्हा आपल्या शरीरातील मीठ आणि इतर खनिजे एकमेकांच्या संपर्कात येतात किंवा एखादं इन्फेक्शन झाल्यास लघवी घट्ट होते, तेव्हा किडनीमध्ये छोटे छोटे स्टोन तयार होतात.
बहुदा लहान आकाराचा स्टोन लघवीच्या माध्यामातून बाहेर येतो. पण स्टोनचा आकार मोठा असेल तर तो बाहेर येऊ शकत नाही आणि त्यामुळे लघवी करताना असह्य वेदना होतात. मग यावर वेगवेगळी उपाय केले जातात. आता यावर आणखी एका आयुर्वेदिक औषध निघालं आहे.
स्टोनचा आकार कमी करेल हे आयुर्वेदिक औषध
एनबीटीने दिलेल्या वृत्तानुसार, लखनौ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बॉटनिकल रिसर्च (NBRI) ने हे औषध तयार केलं आहे. हे औषध किडनी आणि लघवीच्या मार्गातील स्टोनचा आकार घटवून त्याला नष्ट करतो. या संस्थेचे निर्देशक प्राध्यापक एस.के.बारिक यांनी सांगितले की, अनेकदा अॅलोपॅथीक आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये १८ ते २० प्रकारचे फॉर्म्युलेशन असतात, पण आयुर्वेदिक औषध हे ५ सुलभ औषधांना एकत्र करुन तयार केलं जातं. त्यामुळे या औषधाची किंमत १ रुपया प्रति गोळी आहे.
हे आयुर्वेदिक औषध दिवसातून २ वेळा घेतल्यास किडनी स्टोन कमी होण्यास साधारण १० दिवसांचा वेळ लागेल. या औषधाने स्टोनचा आकार बदलवला जाईल, जेणेकरुन शरीर स्टोन शरीराच्या आतील बाजूस चिकटू नये. तसेच हे औषध सर्जरीमुळे खराब झालेले टिश्यू दूर करण्यासही मदत करतं.
UTI ने ग्रस्त महिलाही घेऊ शकतात औषध
तसेच ज्या महिला यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) या समस्येने ग्रस्त आहेत. त्या हे औषध घेऊ शकतात.
औषधाची टेस्ट व्हायची आहे
या नव्या औषधाची ह्यूमन टेस्ट होणे अजून बाकी आहे. औषधाच्या ह्यूमन ट्रायलसाठी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाकडे परवानगी मागण्यात आली आहे. जर या औषधाची ह्यूमन ट्रायल यशस्वी झाली तर हे औषध निश्चितपणे किडनी स्टोनवर रामबाण उपाय ठरेल.