भाज्यांची चव वाढवणारा कांदा आरोग्यासाठीही (onion for health) तितकाच फायदेशीर आहे. कांद्याचा वापर जवळपास प्रत्येक भारतीय घरात दररोज स्वयंपाकात केला जातो. तर दुसरीकडे सॅलड (Salad) म्हणूनही कांदा खूप आवडीनं खाल्ला जातो. उन्हाळ्यात कच्चा कांदा खूप फायदेशीर मानला जातो. कांद्यामध्ये अँटी-एलर्जिक, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. याशिवाय कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळतात. उन्हाळ्याच्या दिवसात आहारात कांद्याचा समावेश केल्यास शरीराला थंडावा मिळतो आणि उष्माघातही टाळता येतो. त्याचबरोबर उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याने अनेक प्रकारचे इन्फेक्शन देखील टाळता येतात. जाणून घेऊया उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याने कोणते फायदे मिळतात.
शरीर थंड राहतेकांद्यामध्ये कूलिंग इफेक्ट असतो, त्यामुळे उन्हाळ्यात कांदा खाल्यानं शरीराला थंडावा मिळतो. कांद्यामध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात जे उष्णतेपासून संरक्षण आणि शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याने शरीराचे तापमान सामान्य राहते आणि आजारही कमी होतात.
उष्णतेपासून संरक्षणउन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी कांद्याचा आहारात समावेश करावा. उष्णतेपासून बचाव करणारे कांद्यामध्ये अनेक घटक आढळतात. उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याने उष्णताही कमी होते आणि डिहायड्रेशन होत नाही.
पचनक्रिया सुधारतेउन्हाळ्यात पचनाचा त्रास होत असेल तर कांदा नक्की खा. सलाड म्हणून कांदा खाऊ शकता. कांदा पचनक्रिया मजबूत करतो आणि पोट निरोगी ठेवण्यास मदत करतो. उन्हाळ्यात अनेकदा लोकांना पोटाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीत कांदा शरीराला निरोगी ठेवू शकतो.
प्रतिकारशक्ती मजबूत आहेकांद्यामध्ये आढळणारे सेलेनियम रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्याचे काम करते. प्रतिकारशक्ती चांगली राखण्यासाठी, आहारात कांद्याचा समावेश करा. कांदा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती बरोबरच विषाणूजन्य आजारही होत नाहीत.
मधुमेहामध्ये फायदेशीरमधुमेहाच्या रुग्णांसाठी कांदा फायदेशीर मानला जातो. पांढऱ्या कांद्यामध्ये आढळणारे काही घटक जसे की क्वेर्सिटीन आणि सल्फर हे मधुमेहविरोधी असतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.