शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

ऑनलाईन क्लासेस तुमच्या चिमुकल्यांवर पडतायत भारी, 'या' समस्यांचे प्रमाण वाढले- तज्ज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 2:19 PM

रुग्णालयात मुलांना भेडसावणार्‍या समस्यांशी संबंधित प्रकरणांपैकी ५० टक्के समस्या ऑनलाइन क्लासेसद्वारे वाढल्या आहेत.

कोरोनाच्या काळात शाळा बंद झाल्यानंतर ऑनलाइन क्लासेसमुळे मुलांच्या अनेक अडचणी वाढल्या. चुकीच्या पद्धतीनं (Posture) बसल्यामुळं लहान मुलांमध्ये मान आणि पाठदुखीचा त्रास वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रुग्णालयात मुलांना भेडसावणार्‍या समस्यांशी संबंधित प्रकरणांपैकी ५० टक्के समस्या ऑनलाइन क्लासेसद्वारे वाढल्या आहेत.

दैनिक भास्कर वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात, ऑर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन (Orthopedic and Robotic Joint Replacement Surgeon) आणि एनएचएस हॉस्पिटल, जालंधरचे संचालक शुभांग अग्रवाल यांनी सांगितले की, 'स्क्रीनसमोर असताना चुकीच्या स्थितीत बसणे आणि या काळात कमी झालेल्या शारीरिक हालचालींमुळे मुले मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली आहेत, तसेच बहुतेक मुलांचे वजन वाढले असल्याचेही दिसून येत आहे. त्यांची सहनशक्ती कमी झाल्याचेही दिसून आले आहे. त्यांच्यामध्ये स्ट्रेसही वाढला आहे आणि त्यांचं मन वारंवार विचलित (Neck and Back lodged Due to Online Class) होत आहे.

इंडियन स्पाइनल इंज्युरीज सेंटर, दिल्ली येथील बालरोग आर्थोपेडिक सल्लागार (Pediatric Orthopedic Consultant) डॉ. सुरभीत रस्तोगी यांच्या मते, अलिकडे मुलांना मान आणि पाठदुखीचा त्रास होत आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे ते एवढा वेळ घरात चुकीच्या पद्धतीनं बसत आहेत, मुलांचे सूर्यप्रकाशात बाहेर पडणे बंद झाले आहे. जास्त वेळ स्क्रीनवर घालवणाऱ्यांनी खबरदारी म्हणून काही उपाय अवलंबले पाहिजेत. कॅल्शियम युक्त आहाराप्रमाणे, सूर्यप्रकाश घेणे, दर अर्ध्या तासाने ब्रेक घेणे. याशिवाय मुलांना दररोज इनडोअर किंवा आउटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यावा लागेल, स्ट्रेचिंग एक्सरसाइज करावे लागतील आणि पाठीचा योग्य आधार घेऊन खुर्चीवर बसावे लागेल.

ऑनलाइन क्लासमध्येच स्ट्रेचिंग व्यायामडॉ. रस्तोगी यांच्या म्हणण्यानुसार, जे शिक्षक मुलांसाठी ऑनलाइन वर्ग घेत आहेत, त्यांनी मुलांना ५ मिनिटांच्या काही मजेशीर स्ट्रेचिंग अ‍ॅक्टिव्हिटी करायला लावाव्यात. १० मिनिटे बसल्यानंतर मुलांना एकदा इकडे तिकडे उभे करून स्ट्रेचिंग प्रकार करवून घ्या. त्यामुळे मुले निरोगी राहतील.

वेदना हलक्यात घेऊ नकाऑर्थोपेडिक सर्जन, उजाला सिग्नस रेनबो हॉस्पिटल आग्रा येथील डॉ. विशाल गुप्ता म्हणतात, “जेव्हा मुले पाठदुखीची तक्रार करतात, तेव्हा अनेक वेळा गंभीर कारण असते, मग ते दुखापत, संसर्ग किंवा ट्यूमर असू शकतो. त्याला तातडीने रुग्णालयात नेवून तपासणी केली पाहिजे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स