(Image Credit : vt.co)
अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील किंवा इतरही अनेक ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट ग्राहकांना आपल्याकडे जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या ऑफर आणि डिस्काऊंट देत आहेत. बरं हे केवळ फेस्टिव सीझनमधेच नाही तर ऑफ सीझनमध्ये या ऑफर दिल्या जातात. हेच कारण आहे की, मोठ्या संख्येने लोक ऑनलाइन शॉपिंगला महत्व देत आहे. आता तर अशा लोकांची संख्या खूप वाढलीये, ज्यांच्यासाठी ऑनलाइन शॉपिंग करणं एक सवय झाली आहे. पण यावर एक्सपर्ट्सचं मत आहे की, ऑनलाइन शॉपिंगची सवय एक प्रकारचा मानसिक आजार आहे.
(Image Credit : womenshealth.com.au)
तुम्हाला ही गंमत वाटेल. पण ही गंमत नसून मोठ्या प्रमाणात लोक या ऑनलाइन शॉपिंगच्या शॉपिंगच्या सवयीपासून सुटका मिळवण्यासाठी ट्रीटमेंट घेत आहेत. अशाच १२२ लोकांची टेस्ट केली गेली. त्यातील ३४ लोकांना ऑनलाइन शॉपिंगचं अॅडिक्शन प्रमाणापेक्षा जास्त होतं. ज्यामुळे त्यांच्यात एंग्जायटी म्हणजे अस्वस्थता आणि डिप्रेशनची लक्षणेही दिसत होते.
जर्मनीच्या हॅनोवर मेडिकल स्कूलच्या वैज्ञानिकांनुसार, आता वेळ आली आहे की, बाईंग शॉपिंग डिसऑर्डर म्हणजेच BSD ला वेगळ्या प्रकारे क्लासीफाय केलं जावं. सोबतच याला एक वेगळी मेंटल हेल्थ कंडिशन ठरवून याबाबत आणखी माहिती एकत्र केली जावी.
२० पैकी एकाला आहे बीएसडी
कॉम्प्रिहेंसिव सायकायट्री नावाच्या जर्नममध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, विकसित देशांमध्ये साधारण ५ टक्के लोक असे आहेत, ज्यांना बाईंग शॉपिंग डिसऑर्डरची सवय लागलीये. जगभरात प्रत्येक २० पैकी एक व्यक्ती याने प्रभावित आहे. यातील प्रत्येकी तीनपैकी एका व्यक्तीला ऑनलाइन शॉपिंग करण्याची सवय लागली आहे.
वैज्ञानिकांनुसार, बीएडीने पीडित व्यक्तीला शॉपिंग करण्याची तीव्र इच्छा होऊ लागते. या आजाराने पीडित व्यक्ती जेवढं त्याला परवडतं, त्यापेक्षा अधिक खरेदी करतो. या कारणाने व्यक्तीला पैशांची कमतरता भासते. परिवारात समस्या होऊ लागतात आणि घरात विनाकामाच्या वस्तू जमा होऊ लागतात.
वैज्ञानिकांना आशा आहे की, त्यांचा हा रिसर्च आणि याच्या निष्कर्षातून मेंटल हेल्थ एक्सपर्ट्सना प्रोत्साहन मिळेल आणि ते बीएसडीच्या या स्थितीबाबत आणखी माहिती मिळवतील. दुसरीकडे रिसर्चमधून हे सांगितलं गेलं असलं तरी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ने शॉपिंगला मेंटल हेल्थ कंडिशनमधे ठेवलेलं नाहीये. तर व्हिडीओ गेम अॅडिक्शन आणि जुगार खेळण्याच्या अॅडिक्शनला मेंटल हेल्थ कंडिशनमधे ठेवलं आहे.