Walking Speed : गेल्या काही वर्षात लोक वेगवेगळ्या गंभीर आजारांचे शिकार होत आहेत. हे आता केवळ म्हातारपणातील आजार राहिलेले नसून कमी वयातही होऊ लागले आहेत. त्यामुळे आजारांसंबंधी वेगवेगळे रिसर्च सतत समोर येत असतात. गेल्या काही वर्षातील रिसर्चमधून समोर आलं आहे की, रोज पायी चालल्याने तुमचा अनेक गंभीर आजारांपासून बचाव होईल आणि एकंदर आरोग्याला फायदाही होईल. पायी चालल्याने तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहील, हृदयारोगांचा धोका टळेल आणि शरीर फीट राहील.
हेच कारण आहे की, अलिकडे जास्तीत जास्त लोक फिटनेसबाबत जागरूक झालेले दिसतात आणि पायी चालण्याला प्राधान्य देतात. सामान्यपणे रोज किमान 10 हजार पावलं चालण्याचा एक ट्रेंड आहे. ज्याचे वेगवेगळे फायदे शरीराला मिळतात. मात्र, फिजिकल अॅक्टिविटीच्या इतरही काही रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, कमी पावलं चालूनही तुम्ही फीट आणि हेल्दी राहू शकता.
रोज किती पावलं चालावीत?
Vanderbilt University Medical Center in Nashville च्या 2022 मधील एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, रोज 8,200 पावलं पायी चालूनही तुम्ही लठ्ठपणा, झोप येण्याची समस्या, गॅसची समस्या, डायबिटीस, तणाव दूर करू शकता.
Sports Medicine जर्नलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, जेवणानंतर 15 मिनिटे पायी चालल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते आणि डायबिटीसचा धोका कमी होतो. सामान्यपणे चालण्याचे अनेक फायदे होतात हे सगळ्यांनाच माहीत असतं. पण चालण्याची पद्धत क्वचितच कुणाला माहीत असेल. पायी चालण्याचा जास्त आणि चांगला फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुमची चालण्याची पद्धतही योग्य असेल.
किती असावा चालण्याचा वेग?
Sports Medicine जर्नलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, डायबिटीससारख्या आजाराचा धोका टाळण्यासाठी पुरूषांनी साधारपणे 1 मिनिटात 87 पावलं आणि महिलांनी 1 मिनिटात 100 पावलं चाललं पाहिजे.
काय चुका टाळाव्या?
तसेच पायी चालताना काही चुका टाळल्या पाहीजे जसे की, पायी चालताना खाली बघू नये. याने मानदुखीसारखी समस्या होऊ शकते. चालताना बॉडीचं पोश्चर सरळ असलं पाहिजे. त्यासोबतच चालायला सुरूवात करण्याआधी थोडा वार्मअप करा. याने स्नायू मोकळे होण्यास मदत मिळेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला शरीरानुसार जेवढं झेपतं तेवढंच चाला. जबरदस्तीने जास्त पावलं चालू नका. टप्प्या टप्प्याने पावलं आणि वेग वाढवा. चालताना काही दुखत असेल तर थोडावेळ आराम करा.