शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

बोटावर मोजेल इतकेच मराठी चित्रपट यशस्वी होतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2016 5:54 AM

१९९१च्या काळात कोणत्याही प्रकारचा प्रमोशन फंडासारख्या गोष्टी नसताना देखील ११८ आठवडे त्यांचा माहेरची साडी हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर कल्ला करत होता.

वयाच्या विसाव्या वर्षी चित्रपटांच्या या मायानगरीत तिने प्रवेश केला. बॉलीवुडसह मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील तिने आपले आपले स्थान निर्माण केले. आज मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करून तीस ते पस्तीस वर्ष पूर्ण झाले असेल तरी ही सुंदर अभिनेत्री या इंडस्ट्रीवर राज्य करीत आहे. १९९१च्या काळात कोणत्याही प्रकारचा प्रमोशन फंडासारख्या गोष्टी नसताना देखील ११८ आठवडे त्यांचा माहेरची साडी हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर कल्ला करत होता. चित्रपटाच्या नावावरून लक्षात आलचं असेल ही सुंदर अभिनेत्री आहे अलका कुबल-आठल्ये. या आभिनेत्रीने मराठी इंडस्ट्रीला वहिनीची माया, तुझ्यावाचून करमेना, मधुचद्रांची रात्र, शुभ बोल नाºया, लपवाछपवी, नातीगोती असे अनेक चित्रपट दिले आहेत. अशा या तगडया अभिनेत्रीचा लोकमत सीएनएक्सने घेतलेला सेलिब्रेटी रिपोटर.         आजच्या चित्रपटांच्या तुलनेत आमच्या काळाचा सिनेमा चांगला होता भले तो सिनेमा ब्लॅकव्हाइट असला तरी. त्यावेळी चित्रपटांचे सुंदर व सशक्त विषय देखील होते. तसेच त्यावेळी व्ही शांताराम, राजा राजाजंपे यांचे चित्रपट पाहून मला कधी कधी असं वाटतं होतं की त्या काळी जन्माला आलं पाहिजे होत.कारण ते चित्रपट देखील नावीण्य व वैविध्यपूर्ण होते. या दिग्गज कलाकारांनंतर होणारे चित्रपट हे अडकून राहिले. जसे की, लावणी,तमाशामध्ये े त्यावेळीचे सिनेमे पूर्ण अडकून राहिले होते. यानंतर पूर्ण कॉमेडीची लाट आली यामध्ये देखील चित्रपट काही वर्षे पूर्णपणेअडकून राहिली. यापाठोपाठ माहेरची साडी हा चित्रपट आला यामध्ये तर दहा वर्षे चित्रपट अडकून राहिला. म्हणून अशा एकाच पद्धतीचे चित्रपट एका पाठोपाठ येत राहिले. पण आदि काळ असा असला तरी लोक काळाच्या पुढे होती. जसे की,व्ही शांताराम यांचे  खूप चित्रपट काळाच्या पुढे होते. तसेच  राजा पराजंपे यांचे कित्येक चित्रपटांमध्ये त्यावेळी जी व्हरायटी होती ती खरचं मानली पाहिजे. पण आता, असे काही विविध विषयांचे चित्रपट पाहायला मिळत नाही असं वाटतं.तेच चित्रपट किवा साउथचे  कॉपी करतात का असं देखील वाटतं.      आता, पुन्हा प्रेक्षक वेगवेगळया सिनेमांकडे वळतो फॅन्ड्री म्हणा, नटरंग म्हणा किवा लय भरी चित्रपट हे प्रेक्षकांना मसालेदार होते.म्हणून ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या अशा  चित्रपटांनंतर पुन्हा प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे वळू लागला त्यामुळे ही एक जमेची बाजू आहे. पण तरी ही बोटावर मोजेल इतकेच चित्रपट यशस्वी होतात. जर मराठी चित्रपटांना व्यावसायिक रूप दिले तरच ते ़यश मिळवू शकतात. पण चित्रपट उभारणीसाठी स्वातंत्र प्रोडयूसर तसा उभा राहू शकत नाही. कारण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रोडयूसर एवढे पाच सहा कोटी पब्लिसीटीला लावणार मग तो प्रेक्षकांपर्यत जाणार तेवढे शक्य नाही. भले आजचे चित्रपट उंचापर्यत पर्यत पोहोचतात त्यांना पुरस्कार देखील प्राप्त होतात. तरी ही मराठी चित्रपटांचा रेशो काढला तर शंभर पैकी दहाच चित्रपट हिट होतात.बाकीचे नव्वद टकके चित्रपट आलेले गेलेले देखील कळत नाही.          प्रोड्यूसर प्रॉडक्शन करतो पण मार्केटिंग ही करतो. पण आताची ही गणित इतकी वाढली की ती एकटया प्रोडयूसरला जमत नाही. तसेच काहीजण डोळयासमोर सबसिडी,सॅटलाइट राइड अस धरूनच येतात. चला, एवढंच आपल्याला मिळेल जर चित्रपट चालला. पण आता हे चित्र बदलायला पाहिजे. सगळ््या प्रोड्यूसरमध्ये कुठेतरी व्यवस्थित प्रमोशनसाठी, मार्के र्टिंगसाठी एकी असणे गरजेचे आहे असं वाटतं. सध्या चार प्रोडयूसर एकत्र येणे या फक्त बोलण्याच्या गोष्टी झाल्या. प्रॅक्टीकली तर काहीच होत नाही.        आता एवढे प्रमोशनचे फंडे पाहिले असता, माहेरची साडीची मार्के र्टिंग आठवते. या यशस्वी चित्रपटाचे पूर्ण क्रेडिट पूर्णत: विजय कोंडकेना देईन. कारण मार्के र्टिंगमध्ये किवा डिस्टीब्युशनमध्ये त्यांचा हातखंडाच होता. आधी माहेरची साडी हा चित्रपट त्यांनी तीन थीएटरसला लावला. मग त्यापुढे तो दहा थिएटरला गेला. मग हळूहळू हा चित्रपट पूर्ण महाराष्ट्रभर धोधो चालला. तसेच आजच्या चित्रपटांसारखे चार आठवडे बुकिंग  देखील नव्हते. पण तो चालू नये आणि चालल्यानतर न थांबणे हे यश विजय कोंडकेचेच म्हणावे लागेल. ११८ आठवडे  हा चित्रपट पुण्यात चालला. त्यावेळी तिकीटे ही तीन ते पाच रूपये अशी होती. म्हणजे त्याकाळी बॉक्स आॅफीसवर मिळविलेला बारा तेरा कोटी पैसा. हा आकडा आता फक्त चित्रपटांच्या मार्के र्टिंगला घालवा लागतो. आताची जर प्रमोशन बिलं मोजली तर ती पाच सहा कोटी प्रमोशनची नुसती बिलं असतात. चित्रपटांची गणित व्यावसायिकरीत्या बदलली आहे. जर एखादा चित्रपट केलाच तर एक कोटी फिल्मसाठी लावला व चार कोटी प्रमोशनसाठी लावला तर मला याची ही खात्री नाही की प्रेक्षक तो चित्रपट पाहायला थिएटरर्स पर्यत पोहोचेल.