आई-वडील आपल्या बाळाची अत्यंत काळजी घेतात. त्यांना कोणताच त्रास होऊ नये यासाठी सतत दक्ष असतात. लहान मुलांसाठी विशिष्ट तेल, पावडर, शॅम्पू यासारख्या वस्तूंची निवड ते अत्यंत पारखून करतात. तसेच, डायपरबाबतही आजचे तरुण पालक खूपच सजग असल्याचं पाहायला मिळतं. बाजारात विविध कंपन्यांचे डायपर उपलब्ध आहेत. पण हल्ली ऑर्गेनिक कॉटन बेबी प्रॉडक्टकडे पालकांचा कल दिसतो. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते अशाच गोष्टींना प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळतं. नवजात बाळाची सुरक्षितता लक्षात घेऊन ऑर्गेनिक डायपरची खास रचना करण्यात आली आहे.
बाळाच्या नाजूक आणि मऊ त्वचेचं रक्षण करण्यासाठी वारंवार डायपर बदलणं महत्त्वाचं आहे. बाळ दिवसातून 20 पेक्षा जास्त वेळा लघवी करतं हे लक्षात घेऊन, प्रत्येक 2-3 तासांनी डायपर बदलण्याची शिफारस तज्ज्ञ करतात. बाळाची चिडचिड टाळण्यासाठी आणि त्वचा कोरडी ठेवण्यासाठी हे अत्यावश्यक आहे. कोरोनाच्या संकटाने सर्वांनाच एक इशारा दिला आहे. त्यामुळे पालक देखील याचा गांभीर्याने विचार करताना दिसत आहेत. विशेषत: जेव्हा बाळाच्या आरोग्याचा प्रश्न येतो, तेव्हा नैसर्गिक घटक, ऑर्गेनिक कापूस केव्हाही अधिक सुरक्षित ठरतो.
डायपरमध्ये पॅराबेन्स, क्लोरीन किंवा लेटेक्ससारखे हानिकारक पदार्थ नसल्याने या नव्या ऑर्गेनिक कॉटन बेबी केअर प्रॉडक्ट्सना अधिक मागणी आहे. ऑर्गेनिक कापूस हा बाळाच्या मऊ त्वचेचे रक्षण करण्यासाठी फायदेशीर आहे. न्युट्रल पीएच लाइनर, 12 तास शोषून घेण्याची क्षमता ही बाळाला रात्रभर आरामदायी ठेवते. त्यामुळेच याचा जास्त वापर केला जात आहे. मऊपणा आणि इतर अनेक गुणधर्मांसोबतच बाळाच्या नाजूक त्वचेच सौम्यपणे संरक्षण करतं म्हणूनच नवीन पालकांनी याला पसंती दर्शवली आहे.
या संदर्भात, किम्बर्ली क्लार्क इंडियाच्या मार्केटिंग डायरेक्टर साक्षी वर्मा मेनन यांनी माहिती दिली. 'हगीज'ने आणलेले ऑर्गेनिक कॉटन बेबी केअर प्रॉडक्ट हे सामान्यांनाही परवडतील अशा दरांमध्ये उपलब्ध असल्याचं त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे, हे डायपर इको फ्रेंडली असल्यानं पर्यावरण रक्षणाचा उद्देशही साध्य होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.