बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2016 5:01 PM
लहान बाळाच्या सर्वांगिण विकासासाठी त्याच्या आयुष्यातील पहिले एक वर्ष महत्त्वाचे असून, याकाळात त्याच्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कारण याच वयात त्याच्या स्नायूंचा विकास होत असतो.
लहान बाळाच्या सर्वांगिण विकासासाठी त्याच्या आयुष्यातील पहिले एक वर्ष महत्त्वाचे असून, याकाळात त्याच्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कारण याच वयात त्याच्या स्नायूंचा विकास होत असतो. कॅनडाच्या मॅकगिल विद्यापीठाच्या क्लिनिकल न्युट्रीशन रिसर्च यूनिटचे अभ्यासक होप वीलर म्हणाले, विटॅमिन-डीमुळे बाळाचे आरोग्यच नाही तर स्नायुसुद्धा मजबूत होतात. हे तपासण्यासाठी अभ्यासकांनी क्युबेक प्रांताच्या १३२ बाळांचा अभ्यास केला. यामध्ये त्यांना पहिल्या महिन्यापासून १२ महिन्यापर्यंत विटॅमिन-डी असलेले वेगवेगळे पदार्थ खायला दिले आहे. अभ्यासकांनी बाळांचे स्नायू आणि द्रव्यमापन करण्यासाठी शरीराचे स्कॅन करुन हाडांचे घनत्व तपासले. संशोधनानुसार, ३ वर्षापर्यंत ज्या बाळाच्यात विटॅमिन-डीचा स्तर उच्च होता. त्यांच्या हाडांची घनता आणि मजबुती चांगली होती. या निरीक्षणानुसार, पहिल्या वर्षापर्यंत हाडांच्या सर्वांगिण विकासासाठी नियमित ४०० युनिट विटॅमिन डीची गरज बाळाला असते.