शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनाची तोडफोड; अज्ञात महिलेच्या कृत्याने खळबळ
2
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
3
अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!
4
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन
5
एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एक कुटुंब दत्तक घ्यावे लागणार
6
कर्नाटकात सीबीआयला प्रवेश बंद; राज्य सरकारने अधिसूचना घेतली मागे
7
डझनभर वंदे भारत ट्रेन ठरतायत पांढरा हत्ती; निम्म्या जागाही भरताना मुश्कील, महाराष्ट्रातील एक...
8
१५०० घरांची झडती, १०० पोलीस, प्लास्टिक कंटेनर...; ५ वर्षांच्या मुलीसोबत थरकाप उडवणारं कृत्य
9
आमी जे तोमार! विद्या बालनची मंजुलिका रुहबाबाला पछाडणार? 'भूल भूलैय्या ३'चा भयानक टीझर रिलीज
10
"...नाहीतर अदानींकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", फडणवीसांचं धारावी प्रकल्पाबद्दल मोठं विधान
11
IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)
12
"मी सिनेमा काढणार", संजय राऊतांनी नावही केले जाहीर; काय बोलले?
13
Vedanta Group : भंगार विकता विकता उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय; पाहा Vedanta ची सुरूवात कशी झाली?
14
शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले
15
Exclusive: प्रिया बापटची Bigg Boss वर प्रतिक्रिया, म्हणाली, "तीनच लोक खरे वाटतात ते म्हणजे..."
16
स्टंटबाजीमुळे कालव्यात पडली कार; पोलिसांची मोठी कारवाई, ५ तरुणांची जेलमध्ये रवानगी
17
"अरबाजचा साखरपुडा झालाय वाटतं", आईचा मोठा गौप्यस्फोट ऐकून हादरली निक्की! अरबाजचे कपडे घेतले अन्...
18
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
19
IPL 2025 : शाहरुखच्या KKR नं खेळला मोठा डाव; MS धोनीच्या सहकाऱ्यानं घेतली गौतम गंभीरची जागा
20
'आदिपुरुष'मधील रावणाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला सैफ, म्हणतो- "आपण धर्मापासून लांबच..."

Overthinking: अतिविचार करण्याची वाईट सवय लागलीय? त्यावर मात करण्यासाठी विचारांना द्या योग्य वळण!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 7:00 AM

Peace of mind : विचार करणे वाईट नाही, पण आपण कोणत्या गोष्टींचा विचार करतो आणि कसा करतो यावर आपले व्यक्तिमत्त्व घडत जाते, त्यासाठी हे विचारांचे नियोजन!

एक धनिक गुरुंजवळ गेला आणि त्यांना म्हणाला, 'गुरुदेव, विचार करून करून माझे डोके भणाणून जाते. ते थांबवण्यासाठी काहीतरी उपाय सुचवा.' गुरुदेवांनी त्याच्या हाती एक चमचा दिला आणि त्याला घेऊन समुद्र किनाऱ्यावर गेले. धनिकाला वाटले, गुरुजी आपल्याला काहीतरी मंत्र सांगणार असतील. बराच वेळ सागरी लाटांकडे पाहिल्यावर एका क्षणी गुरुदेव म्हणाले, `वत्सा, हा समुद्र तुला दिसतोय ना, तो तुला हातातल्या चमच्याने वेचत विरुद्ध बाजूला आणायचा आहे. तसे केल्याने तुझे विचार आपोआप संपतील.' हे ऐकून धनिक चक्रावला, म्हणाला, `गुरुदेव, माझी पूर्ण हयात या कामात निघून जाईल, तरी हा समुद्र इवल्याशा चमच्याने इकडचा तिकडे हलायचा नाही.' यावर हसत गुरुदेव म्हणाले, `वत्सा, एवढे तर कळतेय ना? मग या समुद्राकडे बघ. विचारांचा सागर असाच आहे. त्याला भरती ओहोटी येत राहणार. तू चमचा चमचा प्रयत्न सुरू कर. समुद्र नाही, तर किमान तळे तरी साठेल! म्हणून अतिविचार सोडून दे आणि कामात स्वत:ला गुंतवून घे.'  वरील गोष्टीवरून आपल्यालाही हाच संदेश मिळतो, की नुसता विचार करून उपयोग नाही, त्याला कृतीची जोड द्यायला हवी. परंतु नुसत्या विचारांना बांध कोण घालणार? विचार करू नका म्हटले, की शेकडो विचार येतात. शेकडो विचारांना हजारो फाटे फुटतात. विचारांची ही अखंड साखळी आहे. परंतु त्यातून निष्पत्ती काय? तर शून्य! उलट, अति विचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वातही नसतात...!

हे विचार थांबवायचे तरी कसे? विचारांना चालू, बंद करण्याचे बटण नाही. ते सुरूच राहतात. अशात कोणी फार विचार करू नको असा सल्ला दिला, की विचारांना आणखी चार चाके जोडली जाऊन विचारांची गती वाढते. मग प्रश्न पडतो, विचार करणे ही प्रक्रिया चांगली म्हणावी की वाईट?

विचार करणे चांगलीच बाब आहे, परंतु अति विचार वाईटच! नुसता विचारही वाईटच! मग विचार साखळीचा मध्य कसा गाठावा? तर विचारांची दिशा योग्य आहे की योग्य हे ठरवून! आपल्याला चांगले, वाईट यातला फरक कळतो. आपण आपल्या वैयक्तिक रागा-लोभापायी विचारांकडे तटस्थपणे बघणे विसरतो. ती कला अवगत करायला हवी, म्हणजे विचारांचे संतुलन करता येते.

आपल्याला वाटते, आयुष्यातील प्रश्न संपले, म्हणजे अति विचारांचे चक्र थांबेल. परंतु, हे सत्य नाही. कारण, दरदिवशी नवे प्रश्न निर्माण होत राहणार आहेत. मग, या प्रश्नांची उकल काढत बसण्यात आयुष्य वाया घालवायचे का? प्रश्न सोडून द्यायचे का? दुर्लक्ष करत जगायचे का? तर नाही! विचारांची दिशा बदलायची. केवळ सकारात्मक दृष्टीकोन उपयोगाचा नाही, तर प्रश्न सोडवण्यासाठी आधी वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. वास्तवदर्शी अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. म्हणजे अपेक्षाभंग होत नाही आणि अति विचारांना खतपाणी मिळत नाही. 

विचार दोन प्रकारचे असतात. एक प्रश्नार्थक विचार आणि दुसरे पर्यायात्मक विचार. प्रश्नार्थक विचार न थांबणारे आहेत. त्यांचा विचार करून हाती काहीच लागणार नाही. याउलट पर्यायांचा विचार करून कामाला सुरुवात केली, तर प्रश्न आपोआप सुटत जातील. आपल्याला पर्यायाचा विचार करून प्रश्न मार्गी लावायचे आहेत आणि पर्यायाने आयुष्यही! 

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य