जगातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहे. भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी अमेरिका, युरोपात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष कोरोनावरील लसीकडे लागलं आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सफर्ड विद्यापीठ आणिऍक्स्ट्राजेनका एकत्रितपणे तयार करत असलेली लस वृद्धांच्या शरीरात मजबूत रोगप्रतिकारशक्ती निर्माण करत असल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या वृद्धांवर प्रभावी ठरल्यानं ऑक्सफर्ड-ऍक्स्ट्राजेनकाच्या लसीकडून असलेल्या अपेक्षा उंचावल्या आहेत. फायजर पाठोपाठ सिनोवॅक कंपनीची लस ठरतेय प्रभावी; २८ दिवसात एंटीबॉडीज विकसित होण्याचा तज्ज्ञांचा दावाऑक्सफर्ड-ऍक्स्ट्राजेनकाच्या लसीच्या परिणामकारकतेबद्दलचे काही निष्कर्ष गेल्या महिन्यात लॅन्सेट वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले होते. आता त्याबद्दलची सविस्तर माहिती लॅन्सेटनं प्रसिद्ध केली आहे. सत्तरी ओलांडलेल्या, कोरोनामुळे मृत्यूचा धोका असलेल्यांना वृद्धांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात ऑक्सफर्ड-ऍक्स्ट्राजेनकाची लस प्रभावी ठरल्याचं लॅन्सेटनं म्हटलं आहे.कोरोनाला रोखण्यासाठी भारत करणार लसीच्या तब्बल १५० कोटी डोसची खरेदीवृद्धांना लस टोचल्यानंतर त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या. याबद्दलचे निष्कर्ष अतिशय उत्साहवर्धक आहेत, अशी माहिती ऑक्सफर्ड व्हॅक्सिन ग्रुपचे सल्लागार आणि सहसंशोधक महेशी रामासामी यांनी दिली. 'आरोग्याच्या समस्यांचा सामना करत असलेल्या आणि वयोमान जात असलेल्या लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. या लोकांसाठी कोरोना जीवघेणा ठरू शकतो. आमच्या लसीमुळे त्यांचे जीव वाचतील, अशी आशा आहे. याबद्दल अधिक संशोधन सुरू आहे,' असं रामासामी म्हणाले.काळजी वाढली! कोरोनामुक्त झालेल्यांना 'गुलियन बॅरी सिंड्रोम' या आजाराचा धोका, जाणून घ्या लक्षणंऑक्सफर्ड-ऍक्स्ट्राजेनकाची लस सध्या तिसऱ्या टप्प्यात आहे. सध्या वैद्यकीय समस्यांचा सामना करत असलेल्या व्यक्तींसह सर्वांनाच ही लस देता येईल का, याबद्दलच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. याबद्दलचा अहवाल पुढील काही आठवड्यांत येण्याची शक्यता आहे. कोरोनावरील लसीच्या निर्मितीत सुरुवातीला ऑक्सफर्ड-ऍक्स्ट्राजेनकानं आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर फायझर, बायोएनटेक आणि मॉडर्ना यांनी ऑक्सफर्ड-ऍक्स्ट्राजेनकाला मागे टाकलं. आपण तयार केलेली लस ९० टक्क्यांहून अधिक परिणामकारक असल्याचा या कंपन्यांचा दावा आहे. यापैकी फायझरनं बायोएनटेकसह लस तयार केली असून मॉडर्नानं स्वतंत्रपणे लसीची निर्मिती केली आहे.
Corona Vaccine: शुभवार्ता! ऑक्सफर्ड-ऍक्स्ट्राजेनकाची कोरोनावरील लस वयोवृद्धांवर ठरतेय प्रभावी
By कुणाल गवाणकर | Published: November 19, 2020 4:45 PM