कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला नष्ट करण्यासाठी वैज्ञानिक वेगवेगळे प्रयोग करत आहेत. दरम्यान आता ऑक्सफोर्ड युनिव्हरसिटीने दावा केला आहे की, एका नवीन औषधावर चाचणी सुरू आहे. विकसनशील देशात कोरोनाची मृत्यूचा आलेख कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. वैज्ञानिकांना हे यश मिळाले तर कोरोनाच्या लढाईत हे मोठं हत्यार असू शकतं. टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार रुग्णासाठी एक असे औषध शोधायचे जे लक्षणं दिसल्यानंतर लवकरात लवकरात रुग्णाला बरं करू शकेल. रिपोर्टनुसार या चाचणीत वैज्ञानिक आयव्हरमॅक्टीन औषधाचा शोध घेणार आहेत.
आयव्हरमॅक्टीनचा वापर लाईव्हस्टोक आणि परजीवी किड्यांच्या संक्रमित व्यक्तीच्या उपचारांसाठी केला जातो. काही लोक या औषधाला वंडर ड्रग असंही म्हणतात. ज्यात हजारो लोकांचा जीव वाचवण्याची क्षमता आहे. काही वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधाचे योग्य चाचणी केली गेली नाही तर या औषधाच्या प्रभावशीलतेबाबत अंदाज लावला जाऊ शकत नाही.
ऑक्सफोर्डमधील प्रायमरी केयरचे प्राध्यापक ख्रिस बटलर यांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधात एंटी व्हायरल आणि एंटी इम्फामेटरी गुण आहेत. यामुळे कमी, मध्यम लोकसंख्या असलेल्या देशात लहान लहान चाचण्या घेतल्या जाऊ शकतात. हे औषध रिकव्हरी, इन्फेमेशन आणि हॉस्पिटलायजेशनच्या धोक्याला कमी करू शकते.
प्राध्यापक बटलर यांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधाची चाचणी करून परिणामकारकता तपासली जाणार आहे. हे औषध प्रोटीन्सचा प्रवेश ब्लॉक करते. त्याचबरोबर व्हायरसची प्रतीकृती असलेली क्षमता विकसित करते. जागतिक आरोग्य संघटनेनं सुरूवातीला याबाबत चांगले संकेत दिले होते. ईस्टर्न वर्जिनिया मेडिकल स्कूलचे पॉस मरिक यांनी सांगितले की, ''हे औषध एका दिवसाला हजारो लोकांचा जीव वाचवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ''किडनी स्टोनसह सांधेदुखीसाठी कारणीभूत ठरू शकतं टोमॅटोचं अतिसेवन; जाणून घ्या 'हे' दुष्परिणाम
दरम्यान ब्रिटनच्या कोविड १९ च्या लसीवर काम करणारे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे पीटर हॉर्बी यांनी सांगितले की, ''याची नवीन चाचणी उत्साहवर्धक असेल. यामुळे कोरोना रुग्णांच्या उपचारात मदत होऊ शकते. प्राध्यापक बटलर आणि त्याची टीम या व्हायरसच्या शरीरावरील पकड बनण्यापासून रोखण्यासाठी औषध तयार करत आहेत. '' इम्यूनिटी वाढवणाऱ्या गुळवेलाचे साईड इफेक्ट्ससुद्धा माहीत करून घ्या; अन्यथा 'असं' पडेल महागात