शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
8
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
9
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
10
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
11
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
12
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
13
ऑनलाइन तेल पडले महागात! अमेरिकेत मुलाची केस गळती, वाशीतल्या वडिलांना लाखोंचा गंडा
14
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
15
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
16
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
17
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
19
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

पॅनकेक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 9:33 AM

धिरड्यांना नाक मुरडणारे पॅनकेक मात्र आवडीनं खातात. करून पाहा..

- शुभा प्रभू-साटमपॅनकेक म्हणजे फिरंगी धिरडी. धिरडी म्हटलं की नाक मुरडलं जातं; पण नाव बदललं की मुलंच काय पण मोठेही चवीनं खातात. परदेशात जे पॅनकेक केले जातात त्यामध्ये मैदा, अंडं आणि साखर असते. म्हणजे त्यांची पारंपरिक कृती तशीच आहे. या पॅनकेकवर मग मेपल सिरप, वेगवेगळी फळं, जॅम असं घालून खाल्लं जातं. अमेरिकेत पॅनकेक हे अगदी घरगुती खाणं समजतात. आपल्याकडे कसे आईच्या हातची पुरणपोळी किंवा मोदक आवडीनं खातात तसंच थोडेफार इकडे पॅनकेकच्या बाबतीत होतं. यात वापरलं जाणारं साहित्य तसं पौष्टिक नसतं. त्यामुळेच आपण आपले अस्सल देशी पौष्टिक घटक वापरून पॅनकेक करू शकतो.या पॅनकेकसाठीचं बेसिक साहित्य म्हणजे कणीक, गुळाची पावडर/काकवी हवं तर पिठीसाखर घ्या. या एवढ्या साहित्यातून चवीचे आणि पौष्टिक पॅनकेक करता येतात.कणकेचे पॅनकेकसाहित्य : एक वाटी कणीक, गुळाची पूड/काकवी किंवा साखर (पिठीसाखर अधिक चांगली), आवडीप्रमाणे गोड ताक/पाणी (ताक घेतलं तर चव छान येते), मऊ होण्यासाठी चिमूटभर बेकिंग सोडा, पॅनकेक सजवायला स्ट्रॉबेरी/आंबा/सफरचंद काहीही फोडी करून, मेपल सिरप किंवा मध.कृती : पिठात गूळ/साखर/काकवी घालून (गूळ असेल तर तो नीट विरघळेपर्यंत) एकत्र करा नाहीतर ओतताना त्रास होईल. आता यात ताक घालून बेकिंग पावडर घालून छान सरसरीत करून घ्या. पाचेक मिनिटं मिश्रण तसंच ठेवून द्या. जास्त वेळ ठेवलं तर चांगलं.नॉनस्टिक तव्यावर बटर घालून ते गरम झालं की छोटी छोटी धिरडी काढा. पॅनकेक करताना गॅस मंद हवा. दोन्ही बाजूनं पॅनकेक तपकिरी होईतो शेकून घ्या. वरून मग जे हवं ते टॉपिंग्स घालायचे आणि मध किंवा मेपल सिरप ओतून ते खायचे.हे पॅनकेक अशा पद्धतीनं केले तर छान मऊ होतात. कणीक असल्यानं ते पौष्टिक होतात. सध्या आंबा उपलब्ध असल्यानं आंब्याचा रस जर यावर घातला तर पॅनकेक अफलातून लागतात. मग या पॅनकेकसोबत इतर कशाचीच गरज नाही. हाताशी जरा वेळ असला तर आणखी एक सजावट करू शकता. जी फळं घरात आहेत ती बारीक कापून किंचित वाफवून घ्यावीत. ती मऊ झाली की त्यात घरात असलेला जॅम घालून गार करावीत. मस्त तुकतुकीत दिसतात. याचं टॉपिंग पॅनकेकवर करा, अगदी हॉटेलातल्यासारखी दिसतात. अशा टॉपिंगना फ्रूट प्रिसर्व म्हणतात, पौष्टिक आणि स्टायलिश असा सोपा नाश्ता. एकदा करून पाहा, सारखा करावासा आणि खावासा वाटेल!

(खाद्यसंस्कृती आणि पाककला यांचा प्रदीर्घ अभ्यास असणाऱ्या लेखिका मुक्त पत्रकार असून, स्त्रीमुक्ती चळवळीत कार्यरत आहेत. shubhaprabhusatam@gmail.com) 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स