How to Avoid Dengue and Malaria: पावसाळा सुरू झाला की वातावरण बदलतं. त्यामुळे अनेक आजारही होतात. या दिवसांमध्ये सगळ्यात जास्त केसेस वाढतात त्या डेंग्यू, मलेरिया आणि डायरियाच्या. या दिवसात डास चावल्यामुळे डेंग्यू आणि मलेरियासारखे गंभीर आजार होतात. जर वेळीच यावर उपचार केले नाही तर जीवालाही धोका होऊ शकतो. अशात या आजारांपासून बचाव करण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. ही आयुर्वेदिक औषधं तुम्ही घरीच तयार करू शकता. आम्ही तुम्हाला अशा काही रसांबाबत आणि काढ्याबाबत सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
तुळशीच्या पानांचा रस
तुळशीची पाने आयुर्वेदिक गुणांचा खजिना आहे. या पानांमध्ये डायफोरेटिक आणि अॅंटी-पायरेटिक गुण आढळतात. या पानांच्या सेवनाने शरीरातील घाम वेगाने बाहेर निघतो, ज्यामुळे शरीराचं तापमान कमी होतं व ताप उतरतो.
कडूलिंबाची पाने
डेंग्यू-मलेरियासोबत लढण्यासाठी कडूलिंबाच्या पानांचं सेवन करावं. या पानांमध्ये व्हायरस आणि बॅक्टेरिया नष्ट करण्याचे गुण असतात. या पानांचं सेवन केलं तर मलेरिया, ताप, डेंग्यू आणि फ्लू सारख्या आजारांपासून बचाव करता येतो. पण स्थिती गंभीर असेल तर डॉक्टरांशी संपर्क करा.
दालचीनीचा काढा
मलेरिया-डेंग्यूने पीडित झाल्यावर रूग्ण दालचीनीचा काढा घेऊ शकतात. हा काढा चांगला मानला जातो. आयुर्वेदात याला तापावर चांगलं औषध मानलं आहे. जर तुम्हाला हा काढा कडवत लागत असेल तर त्यात थोडं मध टाकू शकता. पण हा काढा घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
आल्याचा रस
आयुर्वेदाच्या जाणकारांनुसार, जास्त ताप आल्यावर तुम्ही एक चमका आल्याचा रसही सेवन करू शकता. यात अॅंटी इंफ्लेमेटरी आणि अॅंटी बॅक्टेरिअल गुण असतात. हा रस प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच सोबतच ताप आणणाऱ्या व्हायरसचाही अंत होतो.
डास पळवून लावा
हे दोन्ही गंभीर आजार होण्याचं कारण डास असतात. अशात डास घरात राहू नये यासाठी सगळे उपाय करायला हवेत. घरातील कुंड्यांमध्ये किंवा आजूबाजूला पाणी साचू देऊ नका.