व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असे आपण नेहमीच ऐकतो. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. मग ते तिच्या स्वभावाबाबत असो किंवा तिच्या सवयींबाबत. प्रत्येकाचे वेगळे अस्तित्व असते. हे जरी खरे असले तरी प्रत्येकाच्या या वेगळ्या सवयी त्यांच्याबाबत अनेक रहस्य उलगडण्यासाठी कामी येतात. एका संशोधनातून असे समोर आले आहे की, व्यक्तिच्या झोपण्याच्या सवयीवरून समजते की, ती व्यक्ति किती हुशार आहे.
जर तुम्हाला रात्री जास्त झोप येत नसेल. तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण 2009मध्ये झालेल्या संशोधनातून असे समोर आले आहे की, ज्या व्यक्ति आपल्या सर्केडियन रिदमला नियंत्रणात ठेवतात. त्या अत्यंत हुशार असतात. सर्केडियन रिदम एक सायकल असते, ज्यामुळे आपल्या शरिराला आज्ञा मिळतात की, कधी जेवायचे आहे किंवा कधी उठायचे आहे.
ज्या लोकांना रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही. त्यांना अलार्म वाजल्यानंतर सारखा-सारखा बंद करण्याची सवय असते. जर तुम्ही देखील या लोकांपैकी एक असाल तर तुम्हाला तुमच्या या सवयीचा अभिमान वाटला पाहिजे. कारण तुमची ही सवय तुम्ही हुशार असल्याचे संकेत आहेत.
युनिवर्सिटी ऑफ साउथ मटोनने एक संशोधन केले आहे. ज्यामध्ये त्यांनी जवळपास 1229 लोकांना सहभागी केले होते. संशोधनादरम्यान संशोधकांनी लोकांच्या इकॉनॉमिक्स स्टेटससोबत त्यांच्या झोपण्याची तुलना केली. त्यातून असे सिद्ध झाले की, जे लोक रात्री 11 वाजल्यानंतर झोपतात आणि सकाळी 8 वाजता उठतात. त्यांच्यात जास्त पैसे कमावण्याची क्षमता असते.
यातून असे सिद्ध होते की, अनेक लोकं वेळेवर उठण्याचा प्रयत्न करतात. परंतु, जास्त लोकांचा हा प्रयत्न असफल ठरतो. तसे पाहता हा चांगला संकेत आहे. यामुळे कळते की, तुमच्या शरिराचा आवश्यक गरजांशी ताळमेळ आहे.
वैज्ञानिकांचे असे मत आहे की, जे लोकं आपल्या सर्केडियन रिदमला कंट्रोल करू शकतात. ते लोकं जास्त क्रिएटिव्ह आणि महत्त्वकांक्षी असतात. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये अनेक कठिम प्रसंगांशी दोन हात करण्याची क्षमता असते.