(Image Credit : Huffington Post UK)
आतापर्यंत आरोग्याबाबत फार काळजी करणाऱ्या लोकांकडून हेच ऐकलं असेल की, चहा पिणे आरोग्यासाठी चांगलं नाहीये. केवळ सर्दीपासून बचाव करण्यासाठी कधी कधी चहा घेतला तर हरकत नाही. पण तुम्ही कधी हे ऐकलंय का की, चहा पिणाऱ्या लोकांमध्ये जास्त पॉझिटीव्हिटी बघायला मिळते. ही बाब एका रिसर्चमधून समोर आली आहे. यात सांगण्यात आलं आहे की, चहा पिणाऱ्या लोकांमध्ये क्रिएटीव्हिटी आणि एकाग्रता क्षमता दुसऱ्यांच्या तुलनेत अधिक असते.
चहा पिणाऱ्यांसाठी खूशखबर
(Image Credit : Reader's Digest)
या रिसर्चनुसार गरम चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. चीनच्या पेकिंग यूनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये हा दावा करण्यात आला आहे. त्यात सांगितलं आहे की, नियमितपणे चहाचं सेवन करणाऱ्या लोकांच्या एकाग्रतेत आणि मानसिक स्पष्टतेत सुधारणा होते. त्यामुळे त्यांच्यात क्रिएटीव्हिटी अधिक बघायला मिळते.
काय सांगतो रिसर्च?
चहामध्ये कॅफीन आणि थिनीनसारखे तत्त्व असतात. हे तत्त्व एकाग्रता, सावधानी आणि सतकर्ता वाढण्यासाठी ओळखले जातात. रिसर्चनुसार एक कप चहा संपवल्यानंतर काही वेळातच मेंदूमध्ये रचनात्मक रसाचा प्रवाह जाणवतो. मानसोपचार तज्ज्ञांच्या एका टीमने २३ वयाच्या ५० विद्यार्थ्यांवर दोन वेगवेगळे प्रयोग केले. अर्ध्या विद्यार्थ्यांना एक ग्लास पाणी देण्यात आलं, तर अर्ध्या विद्यार्थ्यांना निरीक्षणाची प्रक्रिया सुरू करण्याआधी एक कप ब्लॅक टी म्हणजेच काळा चहा दिला.
फूड क्वॉलिटी अॅन्ड प्रिफरेंस जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चचे निष्कर्ष सांगतात की, दिवसभर चहाचं सेवन केल्याने व्यक्तीची क्रिएटीव्हिटी वाढते. यात सांगण्यात आलं आहे की, ही प्रक्रिया क्रिएटीव्ह काम समजून घेण्यासाठी मदत करते. सोबतच याने मेंदूमध्ये एकाग्रता वाढवण्यात कॅफीन आणि थिनीनची भूमिका स्पष्ट होते.
काय आहे निष्कर्ष?
परीक्षणासाठी एका गटात सहभागी विद्यार्थ्यांना बिल्डींग ब्लॉक्सच्या माध्यमातून आकर्षक आणि क्रिएटीव्ह काम करण्यास सांगण्यात आले. तर दुसऱ्या गटाला एका काल्पनिक नूडल रेस्टॉरन्टला चांगला नाव देण्यास सांगण्यात आलं. ही संपूर्ण प्रक्रिया क्रिएटीव्ह स्तरावर मोजली गेली. रिसर्चमध्ये पुढे देण्यात आले आहे की, हे सर्व चहाच्या प्रमाणावर निर्भर करतं. तसेच या रिसर्चमध्ये हेही सांगण्यात आलं आहे की, कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त केली तर ती नुकसानकारकच ठरते. हा नियम चहासाठीही लागू आहे.
(Image Credit : Weight Loss Groove)
दुसरा रिसर्च काय सांगतो?
दुसऱ्या एका रिसर्चमधून वेगळाच खुलासा करण्यात आला आहे. चहा हा सामान्यपणे गरम प्यायला जातो आणि यात अजिबातच दुमत नाहीये की, गरमागरम चहा पिण्यात एक वेगळीच मजा असते. तुम्हीही असाच विचार करत असाल तर टेस्ट म्हणून हे ठिक आहे. पण आरोग्यासाठी हे चांगलं नाहीये. चहा कपात टाकल्यानंतर साधारण ५ मिनिटांनीच सेवन करावा असं मानलं जातं.
ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्येही हे समोर आलं आहे की, जास्त गरम चहा प्यायल्याने अन्ननलिका किंवा घशाचा कॅन्सर होण्याचा धोका ८ पटीने वाढतो. इराणमध्ये चहा फार जास्त प्रमाणात सेवन केला जातो, तेथील लोक तंबाखू आणि सिगारेटचंही फार जास्त सेवन करत नाहीत. पण तेथील लोकांमध्ये इसोफेगल कॅन्सर आढळला आहे. या मागचं कारण फार जास्त गरम चहा पिणे हे आहे. याने घशाच्या टिश्यूजचं नुकसान होतं.