भारतात आता कोविड १९ ची दुसरी लाट हळूहळू कंट्रोल होत आहे. अनेक राज्यांमध्ये नव्या कोविड रूग्णांची संख्या कमी होत आहे. अशात देशातील हेल्थ एक्सपर्ट आतापासून कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ज्यासाठी सर्वात मोठं लसीकरण अभियान देशभरात सुरू आहे.
कोरोनाची वॅक्सीन घेतल्यावर शरीरात कोरोना व्हायरस विरोधात इम्यूनिटी वाढते. मात्र, नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून खुलासा झाला आहे की, जे लोक कोरोना व्हायरसने संक्रमित झाले आहेत, त्यांच्या शरीरात कोविड वॅक्सीन शिवायही एक वर्षापर्यंत अॅंटीबॉडी राहतात आणि त्यांची इम्यूनिटी व्हायरस विरोधात अधिक मजबूत होते.
Nature वेबसाइटवर प्रकाशित या रिसर्चमध्ये वैज्ञानिकांच्या टीमने ६३ लोकांवर रिसर्च केला. हे लोक कोविडमधून साधारण १.३ महिने, ६ महिने आणि १२ महिन्याआधी बरे झाले होते. यांच्यातील ४१ टक्के लोकांना म्हणजे २६ लोकांना फायजर-बायोएनटेक किंवा मॉडर्नाच्या वॅक्सीनचा एक डोस मिळाला होता. (हे पण वाचा : भारतात आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट AY.1; पुन्हा चिंता वाढली)
रॉकफेलर यूनिव्हर्सिटी आणि न्यूयॉर्कच्या वेइन कॉर्नेल मेडिसिनच्या टिमच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या रिसर्चनुसार, कोविड-१९ इन्फेक्शनमधून बरे झाल्यावर लोकांच्या शरीरात अॅंटीबॉडी आणि इम्यून मेमरी साधारण ६ महिने ते १ वर्षापर्यंत कायम राहू शकते. यावरून हे दिसतं की, कोरोना विरोधात इम्यूनिटी बराच काळ मजबूत राहते.
रिसर्चनुसार, कोविड वॅक्सीनेशनशिवाय कोरोना व्हायरसचे रिसेप्टर बायंडिंग डोमेन प्रति अॅंटीबॉडी रिअॅक्टिविटी, न्यूट्रालायिंग अॅक्टिविटी आणि आरबीडी स्पेसिफिक मेमरी बी सेल्स ६ महिने ते १२ महिन्यांपर्यंत स्थिर राहू शकते. मात्र, कोविड संक्रमणातून बरे झालेले जे लोक कोरोना वॅक्सीन घेतात त्यांच्या शरीरात इम्यूनिटी क्षमता आश्चर्यकारकपणे वाढते. यामुळे कोरोनाच्या कितीही घातक व्हेरिएंटला हरवण्यात यश मिळू शकतं.