उच्च रक्तदाबाच्या (High BP) रुग्णांनी व्यायाम करणं आवश्यक आहे. कारण यामुळं बीपी नियंत्रणात राहण्यास मदत होते. ताणतणाव आणि अनियमित जीवनशैली हे आजच्या काळात उच्च रक्तदाबासाठी (High Blood Pressure) जबाबदार असलेलं सर्वात मोठं कारण आहे. हाइपरटेंशनला उच्च रक्तदाब असंही म्हणतात. हा एक गंभीर आजार असून तो साइलेंट किलर ठरतो.
यामुळे पुढे हृदयविकाराचा झटका (Heart Attack), मूत्रपिंड निकामी होणं, पक्षाघात आणि अंधत्व येण्याचा धोका वाढतो. पण तुम्हाला माहीत आहे का, की रक्तदाबाच्या रुग्णांनी काही प्रकारचे व्यायाम करणं टाळलं पाहिजे. अन्यथा, त्यांच्या हृदयावर अतिरिक्त ताण येऊ लागतो आणि अचानक हृदयविकाराचा झटका (Heart attack) येऊ शकतो. चला जाणून घेऊया, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी कोणते व्यायाम करू नयेत.
झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार व्यायामामुळं रक्तदाब नियंत्रणात राहतो, पण त्यासाठी केव्हाही हलके व्यायाम करणं चांगलं. खूप कमी वेळात खूप वेगानं केलेल्या व्यायामांमुळं रक्तदाब वाढतो. या व्यायामांमध्ये वजन उचलणे, धावणे, स्कूबा डायव्हिंग, स्काय डायव्हिंग, स्क्वॅश इत्यादींचा समावेश आहे, ज्यामध्ये हृदयावर अतिरिक्त ताण येतो. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी असे व्यायाम धोकादायक ठरू शकतात. या व्यतिरिक्त कोणताही व्यायाम करताना, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना डोकेदुखी, वेदना, अति थकवा किंवा उलट्या होत असल्यास त्यांनी व्यायाम ताबडतोब थांबवावा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी कोणते व्यायाम फायदेशीर आहेत?
- चालणे
- जॉगिंग
- दोरीवरच्या उड्या
- एरोबिक्स व्यायाम
- टॅनिंग
- नृत्य आदी.
- उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी व्यायाम करताना या टिप्सकडे लक्ष द्या
- संथ गतीने व्यायाम सुरू करा.
- बीपी वाढल्यास हळूहळू व्यायाम थांबवा.
- तुमच्या शरीराकडे नीट लक्ष द्या.
- जास्त ताण देणारा, ओझं उचलण्यासारखी कामं आणि अति प्रमाणात व्यायाम करू नका.
- जास्त वेळ व्यायाम करू नका.