शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

पाळी पुढे ढकलण्याची गोळी अन् रजोनिवृत्तीआधीचा 'पिरियड'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 4:02 PM

येणाऱ्या सणासाठी सगळी जय्यत तयारी झाली. पण एक महत्त्वाच्या प्रश्नावर तिला उत्तर सापडत नव्हतं. तो प्रश्न म्हणजे त्याच दिवसात नेमकी पाळी आली तर काय करायचं?

- डॉ. नेहा पाटणकर

गौरी गणपती पुढच्या आठवड्यावर आले आणि श्रुतीने बाप्पाच्या आणि गौरींच्या ठेवणीतले दागिने आणि डेकोरेशनच्या सामानाची साफसफाई करायला घ्यायचं ठरवलं. पण ठरवल्यापासून कितीतरी दिवस हे काम मागे पडत होतं. हल्ली तिचं असंच व्हायचं. कुठलीही गोष्ट करायची ठरवली की ती करण्याचा उत्साह कमी व्हायला लागला होता. खरं म्हणजे ऑफिस किंवा घरी काहीच ताण वाढलेला नव्हता. पण नेहमीच्याच कामांचा बाऊ वाटणं, चिडचिड होणं, शारीरिक आणि मानसिक थकवा हे आता रोजचंच झालं होतं. वयाच्या 42व्या वर्षी हे नॉर्मल आहे का?, असं तिला सारखं वाटत राहायचं.

येणाऱ्या सणासाठी सगळी जय्यत तयारी झाली. पण एक महत्त्वाच्या प्रश्नावर तिला उत्तर सापडत नव्हतं. तो प्रश्न म्हणजे त्याच दिवसात नेमकी पाळी आली तर काय करायचं? पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घ्यायच्या का? 3 महिन्यांनी मागच्या महिन्यात पाळी आली होती पण आता या महिन्यात काय? आपण सणांच्या मध्ये पाळी यायला नको म्हणून घेतलेल्या गोळ्यांचाच हा दुष्परिणाम आहे का? असा विचार सतत डोक्यात येऊन झोपेचा पार विचका झाला होता.

श्रुतीसारखाच अनुभव कमी-अधिक प्रमाणात रजोनिवृत्तीच्या आधीच्या "या वळणावर" बऱ्याच स्त्रियांना येऊ शकतो. या रजोनिवृत्तीच्या अवतीभवतीच्या काळाला "perimenopausal period" म्हणतात. 45 ते 55 या वयात साधारण रजोनिवृत्ती होते. पण पाळी पूर्णपणे थांबण्याच्या आधी हार्मोन्स खूप वर-खाली होत असतात. मग या संक्रमणातून जात असताना त्याची लक्षणं अक्षरशः एखाद्या सी-सॉ प्रमाणे येत जात असतात. त्यातली काही लक्षणं खालीलप्रमाणेः

1. पाळीची अनियमितता, अधिक रक्तस्त्राव2. चिडचिडेपणा, अनुत्साह (mood swings)3.  हॉट फ्लशेश4. अंगदुखी, थकवा5. वारंवार युरीन इन्फेक्शन6. वजन वाढणे7. त्वचा कोरडी पडणे

ही सगळीच लक्षणं किंवा त्रास सगळ्यांनाच होतो असंही नाही आणि त्याची तीव्रताही प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असू शकते. या लक्षणांचा पाळी पुढे ढकलण्यासाठी तरुणपणी घेतलेल्या गोळ्यांशी थेट संबंध आहे, असं म्हणण्यासाठी कुठलाही ठोस आधार नाही. पण, पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेऊन आपण हार्मोन्सशी खेळच करतो. त्यामुळे अगदीच गरज असेल तेव्हाच ही गोळी घेणं श्रेयस्कर. 

प्रजननासाठी काम करणारे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन एकमेकांच्या हातात हात घालून एरवी काम करत असतात पण हे कामाचं चक्र बिघडल्यावर मात्र खूप शारीरिक आणि मानसिक स्थित्यंतरं होतात. शरीराच्या छाती, मान आणि कानाच्या भागात अचानक गरमपणा (heat) जाणवतो आणि 4/5 मिनिटांनी घाम फुटतो हा टिपिकल hot flushes चा विचित्र अनुभव येऊ शकतो. हे रात्री झालं तर झोपेची सायकल बिघडते. थकवा जाणवायला लागतो, चिडचिडेपणा वाढतो. इस्ट्रोजेनचा आधार कमी झाल्यामुळे हाडं ठिसूळ व्हायला लागतात, त्वचा कोरडी पडायला लागते. योनीमार्गाची (vaginal) त्वचा कोरडी पडल्याने तिथे खाज सुटते.वारंवार युरीन इन्फेक्शन होतं.

Perimenopausal period साधारण 6 महिने ते 3 वर्षं इतका असू शकतो.

रजोनिवृत्तीकडे जाणारा हा रस्ता घाटाचा, वळणावळणाचा आणि काही ठिकाणी खड्ड्यांचा असू शकतो. यामागचं शास्त्रीय कारण समजून घेऊन याला सामोरं गेलं तर हाच रस्ता एक "Smooth Ride" बनून जातो. 

आपल्या प्रतिक्रिया कळवाः wisdomclinic@yahoo.in

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWomenमहिला