लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरानुसार देशांतर्गत स्थानिक बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच आहेत. बुधवारी पेट्रोल प्रति लिटर ९९.६७ रुपये तर डिझेल ९०.१५ रुपये विकल्या गेल्या. केंद्र सरकार दरदिवशी इंधनाचे दर वाढून ग्राहकांच्या खिशातून छुप्या पद्धतीने पैसे काढत आहे. डिझेलचे दर ९० रुपयांवर पोहोचल्याने मालवाहतुकीचे दर वाढले आहेत. १८ मे रोजी पेट्रोलचे दर प्रति लिटर ९९ रुपये होते. २१ ला ९९.१८ रुपये, २३ ला ९९.३५ रुपये, २५ ला ९९.५७ रुपये आणि २६ मे रोजी दर ९९.६७ रुपयांवर पोहोचले. मे महिन्याच्या अखेरपर्यंत पेट्रोलचे दर १०० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. पॉवर पेट्रोलचे दर प्रति लिटर १०३.११ रुपये आहेत, हे विशेष.